दही घुसळून लोणी काढणं आणि ती कढवणं ही सोपी प्रक्रिया वाटली तरी ती तशी किचकट आहे. पण खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर कणीदार तूप हमखास मिळेल.
- दही घुसळल्यावर आलेलं लोणी अलगद एका पसरट भांड्यात काढून घ्या. कारण ते धुवायला बरं पडतं.
- लोणी दोन-तीनदा पाणी टाकून धुऊन घ्यावं, म्हणजे त्यातला आंबट अंश नाहीसा होतो आणि लोणी जास्त मिळतं.
- लोणी मंद गॅसवरच कढवावं.
- लोण्यातला उरलासुरला आंबट अंश खाली बसून तो सोनेरी रंगाचा व्हायला लागल्यावर गॅस घालवावा. अन्यथा लोणी करपू लागतं.
- गॅस बंद करण्यापूर्वी त्यात विड्याचं पान टाकावं, म्हणजे लोणी टिकतं.
- गॅस बंद केल्यावर त्यात थोडं मीठ टाकावं, त्यामुळे लोणी रवाळ होतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट