Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

लुसलुशीत लसानिया

$
0
0

चीज आणि मेक्सिकन किंवा इटालियन सॉसमध्ये घोळवलेला पास्ता हा अनेकांचा आवडीचा पदार्थ असतो. असं चवीनं पास्ता खाणाऱ्यांच्या प्राधान्यक्रमामध्ये सध्या लसानिया अग्रस्थानी आहे. पातळ पास्ता शिट आणि स्टफिंग याचे एकावर एक थर रचून लसानिया बनवला जातो. असा हा चविष्ट लसानिया मिळणाऱ्या पाच जॉइंट्सविषयी...

लसानिया व्हेजेरियाना

अनेक प्रकारच्या भाज्या, सोया ग्रॅन्युअल्स आणि हर्ब्स घातलेला लसानिया लोअर परळ येथील ‘तलाव्हीया’मध्ये मिळतो. तो खाल्ल्यावर, खाणारा ‘चविष्ट, लुसलुशीत आणि अप्रतिम’ अशी प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहत नाही.

ढोकळा लसानिया

भारतीय-इटालियन किंवा भारतीय-मॅक्सिकन हे फ्युजन पदार्थ आपल्यासाठी नवीन नाहीत. असंच एक अनोखं फ्युजन म्हणजे ‘ढोकळा लसानिया’. तो विलेपार्ले येथील ‘ट्विक’ या कॅफेमध्ये मिळतो. ऐकून आश्चर्य वाटणं साहजिक आहे, पण हा पदार्थ खाण्यासाठी या कॅफेमध्ये गर्दी जमते.

लसानिया रोल्स अप

पौष्टिक अशा भाज्या स्टफ केलेला ‘लसानिया रोल्स अप’ हा प्रकार विलेपार्ले येथील ‘द फ्रेंड्स बेंच ऑल डे कॅफे’ येथे मिळतो. या पदार्थाचं वैशिष्ट्य म्हणजे इतर कोणत्या तिखट-आंबट चवीच्या सॉसबरोबर सर्व्ह न करता मिरची-मध डीप त्यासोबत सर्व्ह केलं जातं. या पदार्थाच्या अनोख्या गोड-तिखट-आबंट आणि चीजी चवीमुळे तोंडाला एक वेगळी चव येते.

पोमोडोरो चीज लसानिया

तोंडी लावण्यासाठी टोमॅटो सॉसचा वापर होतो, पण एखाद्या पदार्थात ग्रेव्ही म्हणून घालण्यासाठी ज्या टोमॅटो सॉसचा वापर होतो त्याला पोमोडोरो असं म्हणतात. याच पोमोडोरो सॉस आणि चीजचा वापर केलेला लसानिया खारघरच्या ‘दा कॅपो कॅफे’ आणि ‘ब्रिस्तो’ येथे मिळतो.

लसानिया सुप्रिम

लुसलुशीत लसानिया पास्ता हा पेस्तो सॉसबरोबर घोळवून त्यात मक्याचे दाणे, बेबकॉर्न, ब्रोकोली आणि सिमला मिरची घातली जाते, त्याला ‘लसानिया सुप्रीम’ असं म्हणतात. असा हा रसरशीत पास्ता मुलुंडच्या ‘फॅमिली ट्री’ या कॅफेमध्ये मिळतो. वेगळ्या अशा चवीमुळे हा लसानियाचा प्रकार खाण्यासाठी या कॅफेमध्ये लांबून मंडळी येतात.

संकलन- शब्दुली कुलकर्णी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>