साहित्य - ४ बटाटे उकडून कुस्करलेले, ४ कांदे बारीक चिरलेले, प्रत्येकी एक चमचा तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला, मीठ-साखर चवीप्रमाणे, ६ पाव, ४ चमचे बटर, ४ चमचे चिंचेची पेस्ट, ४ चमचे लसणाची चटणी, बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा वाटी, अर्धा वाटी प्रत्येकी डाळिंबाचे दाणे नि तिखट शेंगदाणे, बारीक शेव.
कृती - प्रथम कढईत बटर घालून अर्धा कांदे लालसर परतून त्यात तिखट, हळद, धणे-जिरेपूड, गरम मसाला, चाट मसाला घालावा. हे मिश्रण छान परतल्यावर मग त्यात अर्धी वाटी पाणी घालून उकळी आली की बटाटा घालून मीठ-साखर घालावी. त्यानंतर एक चमचा चिंचेचा कोळ आणि आणखी अर्धा वाटी पाणी घालून भाजी छान एकजीव करावी. ५ मिनिटांनंतर गॅस बंद करून, त्यावर उरलेला कांदा, सगळी कोथिंबीर, शेंगदाणे नि डाळिंबाचे दाणे घालून सर्व तयार ठेवावं. मग एका फ्राय पॅनवर बटर घालून मध्ये कापलेला पाव छान भाजून घ्यावा नि एका बाजूला लसूण चटणी, एका बाजूला चिंचेची पेस्ट आणि मध्ये भाजी घालून परत कांदे नि डाळिंबाचे दाणे घालून अजून फ्राय करावा. अशी दाबेली शेवमध्ये घोळवून सर्व्ह करावी.
- चारुशीला प्रभू, ठाणे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट