Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

सुरळीच्या नाजुक वड्या

$
0
0

साहित्य : एक वाटी बेसन पीठ, दोन वाट्या आंबट ताक, एक वाटी किसलेले ओले खोबरे, अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा मोहरी, आवश्यकतेनुसार तेल, चवीनुसार मीठ, एक चमचा लाल तिखट

कृती : एक पातेल्यात ताक घेऊन त्यात लाल तिखट व चवीनुसार मीठ घालावे. त्यातच बेसन पीठ घालून ते चांगले फेटून घ्यावे, ज्यामुळे गुठळ्या राहणार नाही. एवढं झाल्यावर गॅसवर नॉनस्टिक पॅनमध्ये दोन ते तीन छोटे चमचे तेल टाकून ते कडकडीत गरम करा. मग त्यात बेसन आणि ताकाचे केलेले मिश्रण टाका व सतत ढवळत राहा. जोपर्यंत पीठ चमच्याला धरून घट्ट धार लागत नाही, तो पर्यंत ढवळत राहायचे. असे घट्ट धारेचे मिश्रण तयार झाले की गॅस बंद करा.
मग एका मोठ्या पसरट ताटाला तेलाचा मुलामा देऊन हे पिठाचं मिश्रण हलकेच कागदाच्या पापुद्र्या इतके पसरट पसरवून घ्यावे. अशी दोन तीन ताटं तयार करावीत. पंधरा मिनिटांनी हे थंड झाले की त्याच ताटावर त्या पसरवलेल्या पिठावर सरळ रेषेत सुरीने काप द्यावेत आणि त्याच्या सुरळ्या बनवाव्यात. ह्या सर्व सुरळीच्या वड्या एका चांगल्या ताटात ठेवून त्यावर ओले खोबरे व कोथींबीर छान पेरावी. मग दोन चमचे तेलात एक चमचा मोहरीची खमंग फोडणी तयार करावी. ही खमंग फोडणी सुरळीच्या वड्यांवर छान पसरावी, म्हणजे आपल्या छान सुरळीच्या नाजुक वड्या खायला तयार!

तनुजा हेरंब प्रधान, सानपाडा-नवी मुंबई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>