Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

आवळ्याची चटकदार चटणी

$
0
0

हिवाळ्यात बाजारात आवळे छान मिळतात. आकाराने लिंबाएवढे असलेले हे आवळे नुस्ते खाल्ले, तर चवीला जरा तुरट लागतात. म्हणूनच ते नुस्ते खाण्याऐवजी त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ करूनच ते खाल्ले जातात. साधारणपणे या मोठ्या आवळ्यांपासून लोणचं, मुरांबा, आवळा सुपारी, असे विविध पदार्थ नेहमीच केले जातात. परंतु या नेहमीच्या पदार्थांपेक्षाही एक हटके पदार्थ या आवळ्यांपासून बनवता येतो, तो म्हणजे आवळ्याची चटणी. ही चटणी अतिशय चटकदार होते. पराठे आणि पुऱ्यांसोबत खायला एकदम मस्त. भरपूर औषधी गुणधर्म असलेला हा रान-आवळा एरवी आपल्या पोटात जात नाही. परंतु अशा पदार्थांमुळे तो पोटात जातो आणि त्यामुळे शरीरस्वास्थ्यही राखले जाते.

साहीत्य :
७-८ आवळे, एक मोठा चमचा लोणचे मसाला, एक वाटी बारीक केलेला गूळ, एक मोठा चमचा तेल, चवीपुरतं मीठ, अर्धा लिंबू

कृती : आवळे स्वच्छ धुऊन घ्यावेत. नंतर ते नट पुसून किसून घ्यावेत. या तयार किसामध्ये मीठ घालून, किस थोडा पिळून त्यातील तुरट पाणी काढून टाकावं(या काढलेल्या पाण्याचं छान सरबत करावं). मग एका भांड्यात तेल गरम करून थंड करावं. थंड झालेल्या तेलात लोणचे मसाला, गूळ घालून ते मिश्रण एकजीव करावं. नतंर आवळ्याचा किस घालावा आणि लिंबाचा रस घालून मिश्रण छान एकत्र करावं. हे मिश्रण व्यवस्थित घोटावं. म्हणजे झाली आ‌ळ्याची चटकदार चटणी तयार. ही चटणी फ्रिज मध्ये ८ दिवस छान राहते.

-निलीमा खडतकर, मीरा रोड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>