Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

सफरचंद जिलेबी विथ गुलाब आईस्क्रीम

$
0
0

होळीच्या सणाला जिलेबीही आवडीनं खाल्ली जाते. नेहमीपेक्षा थोडी वेगळी जिलेबी नक्की करून खाऊन बघा.

सफरचंद जिलेबीसाठी साहित्य - दोन मध्यम आकाराचे सफरचंद, एक कप मैदा, दीड कप साखर, थोडंसं केशर, जिलेबी तळण्यासाठी साजूक तूप, पाव टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून ड्राय यिस्ट, एक टीस्पून गुलाबाचं पाणी, सजवण्यासाठी पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या.

गुलाब आईस्क्रीमसाठी साहित्य - १०० ग्रॅम गुलाबाच्या पाकळ्या, २०० मिली व्हॅनिला आईस्क्रीम, दोन ते तीन टेबलस्पून गुलकंद, पाऊण कप पिस्त्याचे आणि बदामाचे काप

सफरचंद आईस्क्रीम बनवण्याची कृती - प्रथम सफरचंदाची सालं काढून घ्या आणि त्याचे छोटे-छोटे तुकडे करुन घ्या. नंतर एका भांड्यात साखरेचा पाक तयार करुन घ्या. त्यात केशर घाला. आता एका कढईत साजूक तूप गरम करा. दुसऱ्या भांड्यात यिस्ट आणि गरम पाणी घ्या. मिश्रण चांगलं एकजीव करुन घ्या. त्यात मैदा, वेलची पूड, सफरचंदाचे तुकडे आणि गुलाबपाणी घाला. यात सफरचंदाचे तुकडे घातले असल्यामुळे तुपात जिलेबी सोडताना ती नेहमीपेक्षा वेगळ्या आकारात सोडा. जिलेबी तळून झाल्यावर त्या साखरेच्या पाकात सोडा. नंतर त्यातून काढून त्यावर पिस्त्याचे काप भुरभुरा.

गुलाब आईस्क्रीम बनवण्याची कृती- मिक्सरच्या भांड्यात व्हॅनिला आईस्क्रीममध्ये गुलाबाच्या पाकळ्या, गुलकंद घाला आणि ते वाटून घ्या. नंतर हे मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात पिस्ता आणि बदामचे काप घाला. आता हे आईस्क्रीम फ्रिजमध्ये सेट व्हायला ठेवा.

टीप -
सर्व्ह करताना सफरचंद जिलेबीवर गुलाब आईस्क्रीमचा स्कूप ठेवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>