वडापाव नामक खाद्याच्या असंख्य व्हरायटी समस्त मराठी लोकांनी आतापर्यंत खाल्ल्या असतील. त्यातच भर म्हणून सिंहगड रस्त्यावरील बर्गर वडापाव खाण्याजोगा. वड्यासोबत बर्गरला येतो तसा पाव वापरल्यानं त्याचं ‘बर्गर वडापाव’ असं नामकरण आम्हीच केलेलं आहे.
↧