चकचकीत स्टीलचं किंवा अॅल्यूमिनियमचं मोठं पातेलं. सोबत आणखी एखादं भांडं/ डबा किंवा पिशवी. हा सगळा वजनदार डोलारा कधी डोक्यावर तोललेला, तर कधी सायकलवर लावलेला. एवढ्या साजासह माफक बोली हिंदी आणि बहुधा म्हणूनच हातातला ‘पों पों’ वाजणारा भोंगा... ही ओळख मुंबईतल्या इडलीवाल्याची.
↧