कोळंबी स्वच्छ धुवून तिला हळद, मीठ आणि लिंबाचा रस चोळावा. तापलेल्या तेलात बारीक चिरलेला कांदा, हळद, मसाला, आलं-लसूण पेस्ट आणि चमचाभर वाटलेलं खोबरं घालावं. कांद्याला तेल सुटल्यावर कोळंबी घालावी. दहा मिनिटांनी कोळंबी शिजली, की गॅस बंद करावा.
↧