साहित्यः
चक्का - १०० ग्रॅम, स्पाँज केक - १ (त्याचे २ लेअर करुन घ्यावेत)
जिलेटीन - १ मोठा चमचा
गरम पाणी - १/४ कप
अंडी - २ (पांढरा भाग)
साखर - २५० ग्रॅम
व्हॅनिला इसेन्स - १/२ छोटा चमचा
लिंबूचा रस - १-२ चमचे
लिंबू - १
स्ट्रॉबेरी - १ किलो
रासबेरी - १ डबा (रासबेरी नसल्यास चेरी वापरु शकता)
केक करायचे भांडे, ज्याचा बेस वेगळा करता येतो.
मॅस्कारपोन चीज (Mascarpone cheese) - ५०० ग्रॅम
कृती:
प्रथम पाव कप गरम पाण्यामधे जिलेटीन टाकून, विरघळवून घ्यावे. आता मॅस्कारपोन चीज रुम टेम्प्रेचरला आणावं. दोन अंड्यातला पांढरा भाग आणि साखर इलेक्ट्रीक बिटरने मिक्स करुन घ्यावे. याचे मिश्रण पूर्ण घट्ट होईपर्यंत फेटावे. दुसऱ्या वाटीत चीज आणि दही नीट मिक्स करावे. त्यात गरम पाण्यात विरघळलेले जिलेटीन टाकावे. हे सर्व एकत्र करावं. त्यात गुठळ्या होऊ देऊ नये. आता या मिश्रणात व्हॅनिला इसेन्स, अंड्यातला पांढरा भाग, साखर यांचे मिश्रण टाकून मिक्स करावे. यात लिंबू रस घाला. आता लिंबाचा वरचा भाग किसून घ्या. यातला पाव चमचा किस वरील मिश्रणात टाका. केकच्या भांड्यामधे सगळ्यात आधी खाली लोणी लावून घ्या. स्पाँज केकचा १ लेअर लावावा.
त्यावर चीजचं अर्ध मिश्रण टाका. ते नीट पसरून त्यावर अर्ध्या चिरलेल्या स्ट्रॉबेरीज लावून सजवा. आता यावर केकचा दुसरा लेअर आणि उरलेलं चीजचं मिश्रण टाकून नीट पसरा. हा केक २-३ तास फ्रीजमधे सेट करावा. २-३ तासानंतर केक बाहेर काढून त्यावर रासबेरी आणि स्ट्रॉबेरी लावून केक सजवा. परत अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर केक बाहेर काढा. त्याच्या कडा सुरीने सोडवून घ्या. आता केकच्या भांड्याचा बेस वेगळा करून घ्या.
प्रेमा पाटील