Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

प्रॉन्स बिर्याणी

$
0
0

(शब्दांकन ः निनाद पाटील)

साहित्य ः अर्धा किलो सफेद कोळंबी, अर्धा किलो बासमती तांदूळ, मूठभर खडा मसाला, एक चमचा कोकम आगळ, चिंचेचा कोळ, एक चमचा तिखट, छोटा चमचा हळद, चार कांदे, मूठभर आलं खोबर, एक चमचा गरम मसाला पावडर, दोन तिरफळ, दोन टॉमेटो.

कृती ः तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवावा. कोळंबी स्वच्छ धुवून तिला चिंचेचा कोळ, कोकम आगळ, मीठ, हळद, तिखट लावून मॅरिनेट करावं. खोबरं, एक कांदा आणि खडा मसाला मंद आचेवर खमंग भाजून अगदी बारीक वाटावं. कुकरमध्ये तेल तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टॉमेटो परतावा. त्यात वाटण घालून ढवळावं. कडेकडेनं तेल सुटल्यावर त्यात दोन तिरफळं, प्रॉन्स घालून एक वाफ घ्यावी. त्यात बासमती तांदूळ घालून अगदी अलगद हलवावं आणि त्यात बेताचं पाणी, मीठ घालावं. तीन शिट्या झाल्यावर गॅस बंद करावा. गरमागरम सर्व्ह करताना चमचाभर साजूक तूप, कोथिंबीर आणि तळलेला कांदा पेरून वाढावं.


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles