सोलापूरच्या चटकदार शेंगा चटणीने हा हा म्हणता महाराष्ट्राच्या काय, देशाच्याही सीमा ओलांडल्या आहेत. ही चटणी खवय्यांच्या जिभेचे चोचले हलकासा चटका देत देत पुरवते. त्याचवेळी, एकेकाळची ‘गिरणगाव’ ही ओळख पुसली गेलेल्या या कष्टकरी शहरात शेकडोंना रोजगारही देते. शेंगा चटणी हे मोठे भावंड. त्याची निरनिराळ्या चवीची इतर भावंडेही एव्हाना सोलापुरी चवीचा झेंडा जगभर फडकवू लागली आहेत...
↧