>>दिक्षा कोलगे
साहित्य:
ताज्या ब्रेडचं एक पॅकेट, २ अंडी, चवीनुसार मीठ, दिड चमचा मसाला, अर्धा वाटी दुध, चिमुटभर साखर.
कृती : वाटीत दुध घेऊन त्यात अंडी फोडून त्यात मीठ, मसाला, चिमुटभर साखर टाकावी. हे मिश्रण चांगलं फेटुन घ्यावं. आता ते ब्रेडच्या स्लाईसला दोन्ही बाजुला लाऊन ब्रेड शॅलो फ्राय करावेत. गरमागरम असताना सर्व्ह करावं. यावर लिंबू पिळूनही छान लागतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट