साहित्य - अर्धा किलो कोळंबी, अर्धा किलो बासमती तांदूळ, मूठभर खडा मसाला, लिंबू, एक चमचा तिखट, छोटा चमचा हळद, चार कांदे, मूठभर आलं आणि खोबरं, एक चमचा गरम मसाला पावडर, एक टोमॅटो.
कृती - तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवावा. कोळंबी स्वच्छ धुवून तिला लिंबू, मीठ, हळद लावून मॅरिनेट करावं. खोबरं, एक कांदा आणि खडा मसाला मंद आचेवर खमंग भाजून अगदी बारीक वाटावं. कुकरमध्ये तेल तापल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो व कोळंबी घालून परतावा. या कोळंबीला आता पाणी सुटेल, त्यात कोळंबी शिजवून घ्यावी, आता यात तांदूळ नथिळून घालावेत, त्यात वाटण घालून ढवळावं. बासमती तांदूळ घालून अगदी अलगद हलवावं आणि त्यात बेताचं पाणी, मीठ घालावं. तीन शिट्या झाल्यावर गॅस बंद करावा. आधी मीठ लावल्याने पुन्हा मीठ घालताना अंदाजाने घालावं, वरून कोथिंबीर पेरावी हवे असल्यास काजू तुकडे घालून गरमागरम सर्व्ह करावं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट