साहित्य :- अॅपल २ नग, साखर २ वाट्या, पनीर अर्धी वाटी, बदाम पिस्त्याचे काप ४ चमचे मध २ चमचे
कृती :- अॅपलमधून दोन भाग करून मधला भाग काढून टाकावा. त्याला ८ ते १० मिनिटे बेक करावे किंवा तळून घ्यावं. पनीर किसून त्यात साखर मिसळून तव्यावर परतून त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवावे. त्यानंतर अॅपल वाटीमध्ये हे बॉल्स ठेवून त्यावर मध, बदाम पिस्त्याचे काप घालावे. छोट्या फ्रॉयपॅनवर साखर घालून त्याची तार काढून त्या तारांनी अॅपलभोवती घरट्यासारखे गुंडाळावे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट