सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्टतर्फे आयोजित या फेस्टिवलचे उद्घाटन आज, शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता ख्यातनाम अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवात खाद्यांतीसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचा भरगच्च नजराणाही रसिकांना भेट मिळणार आहे. फॅशन शो, गाणी, गप्पांची मुक्त मैफलही येथे जमणार आहे. शुक्रवारी १६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० तर शनिवार १७ जानेवारी आणि रविवार १८ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी ३, संध्या. ५ ते रात्री १० या वेळेत या फेस्टिवलचा आनंद घेता येणार आहे.
सीकेपी व्यावसायिकांच्या उत्पादनांना तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या महोत्सवामध्ये विशेष स्टॉल्स आहेत. सीकेपी समाज अस्सल मांसाहारी खवय्या म्हणून परिचित आहे. चिंबोरीचे कालवण, सुरमर्इ फ्राय, तळलेले बोंबिल आणि खिम्याचे कानोले ही सीकेपींची खासियत. तर शाकाहारी पदार्थात सीकेपी सुगरणींची मसुरीची आमटी आणि वालाचे बिरडे या पाककृतींची लज्जतही औरच असते. सीकेपी खाद्यसंस्कृतीमधील या पदार्थांची ओळख करून देणे हे या खाद्य महोत्सवाचे प्रयोजन असल्याचे आयोजक समीर गुप्ते सांगतात. या फेस्टिवलचे देणगी मूल्य वीस रु. आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट