शर्वरी पाटील, भांडुप
साहित्य - बोनलेस चिकन अर्धा किलो, एक लहान चमचा हळद, एक चमचा काश्मिरी मिरपूड, एक चमचा मालवणी मसाला, एक चमचा बार्बेक्यू सॉस, एक चमचा आलं लसूण पेस्ट, दोन मोठे चमचे दही, मीठ आणि तेल चवीप्रमाणे.
कृती - पहिल्यांदा बोनलेस चिकनचे बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यावेत. वरील सर्व साहित्य चिकनला चोळून पाच ते सहा तास मॅरीनेट करून तयार ठेवा. फ्राइंग पॅनमधल्या तापलेल्या तेलात चिकन अलगद सोडा. पॅनवर झाकण न ठेवता ते सोनेरी रंगावर कुरकुरीत शिजवून घ्या. चटपटीत चिकन तय्यार.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट