भारती पाटील
साहित्य - एक वाटी नाचणीचे पीठ, अर्धी वाटी रवा, १ मोठा चमचा तेल, कढीपत्ता, मोहरी, चवीनुसार मीठ, २ ते ३ लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे, थोडीशी साखर, लिंबू रस, नारळाचा चव किंवा भाजलेले शेंगदाणे.
कृती - नाचणीचे पीठ व रवा अर्ध्या तेलामध्ये खमंग भाजून एका डिशमध्ये काढून घ्यावा. उरलेल्या तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. त्यावर रवा व नाचणीचे भाजलेले मिश्रण घालावे. हे पीठ व्यवस्थितपणे परतून त्यामध्ये मीठ, साखर, लिंबूचा रस आणि शेंगदाणे घालावेत. हे करत असतानाच एकीकडे गॅसवर मंद आचेवर पाणी गरम करावे. हे पाणी मिश्रणामध्ये ओतून एक वाफ आणावी. सांजा सर्व्ह करताना त्यावर वरुन नारळाचा चव घालावा. सकस व चवष्टि सांजा तयार होईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट