कोकम सरबत
साहित्य- १ किलो ताजी लाल कोकम, अडीच किलो साखर, चमचा जरिेपूड, २ चमचे मीठ.
कृती- कोकम स्वच्छ धुवून पुसून आतला बियांचा भाग काढावा. तयार झालेल्या वाट्यांमध्ये साखर भरून ती मोठ्या काचेच्या बाटलीत अधे मधे साखरेचा थर देऊन भरावी. रोज बाटलीतील कोकम खालीवर हलवावे. सर्व साखर विरघळली की, कोकमांचा अर्क गाळून घेऊन त्यात मीठ व जिरेपूड घालून त्याचं सिरप करावं आणि बाटलीत भरून ठेवावं. जरुरीनुसार पाण्यात मिसळून सरबत तयार करावं.
कैरी-काकडी सरबत
साहित्य - एक छोटी कैरी, अर्धी काकडी, अर्धा टी स्पून धनेजिरेपूड, साधारण अर्धी वाटी गूळ(कैरी जास्त आंबट असेल तर गूळाचं प्रमाण वाढवावं.), चवीपुरतं मीठ किंवा सैंधव, दोन तीन पुदिन्याची पानं (हवी असल्यास)
कृती - कैरी बारीक किसून घ्या. काकडी अगदी बारीक चिरून घ्या. गूळही किसून घ्या. आता कैरी, काकडी, गूळ, सैंधव, धनेजिरे पूड, पुदिन्याची पानं हे सगळं मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. त्यानंतर त्यात अर्धी वाटी साधं पाणी घाला. आधी घालू नका. तसं केलं तर ते नीट वाटलं जात नाही. या सगळ्याची चटणीसारखी पेस्ट तयार व्हायला हवी. गोड जास्त हवं असल्यास गूळाचं प्रमाण वाढवा. पुन्हा एकदा हवं तितकं पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. हे थंडगार सरबत छान लागतं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट