उन्हाळा असो वा हिवाळा आपल्याला कॅलरीजची गरज लागते. मात्र, या कॅलरीज प्रमाणात असाव्यात हेसुद्धा पहावे लागते. उन्हाळ्यात सातत्यानं आपल्याला पातळ पदार्थ घ्यावे लागतात. त्यावेळी केवळ पाणी पिवून चालणार नाही. चहा, हॉट चॉकलेट, ज्यूस, शेक प्यायल्यास कॅलरीज वाढतात. इथे दिलेल्या रेसिपीज कॅलरी कॉन्शस असणाऱ्यांना आणि सर्वांना करण्यासारख्या आहेत.
ग्रीन टी
साहित्य : पाव वाटी ग्रीन टी लिव्ज २ चमचे साखर १ चमचा लिंबाचा रस २ वाट्या थंड पाणी अधीर् वाटी गरम पाणी पाव चमचा दालचिनी पावडर.
कृती : एका भांड्यात गरम पाणी आणि ग्रीन टी टाकून थोडंसं उकळवावं. थंड झाल्यावर गाळून घेऊन त्यात २ वाट्या थंड पाणी आणि थोडासा बर्फ टाकावा. त्यात साखर लिंबाचा रस आणि दालचिनी पावडर टाकावी. सर्व एकत्र मिसळून थंड र्सव्ह करावं. या रेसिपीमधे साखरेच्या ऐवजी डायबिटिक शुगर किंवा लो-कॅलरी शुगर वापरून डायबिटिक पेशण्टसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
मँगो-ऑरेंज शेक
साहित्य : अधीर् वाटी मँगो पल्प १ वाटी ऑरेंज ज्यूस १ वाटी क्रीम १ वाटी दूध अर्धा चमचा जायफळ पावडर १ चमचा साखर १ अंडं
कृती : एक वाटी दूध गरम करून
त्यात अंडं आणि साखर टाकून मंद गॅसवर जरा जाड होईपर्यंत ढवळत राहावं. नंतर त्यात थंड क्रीम टाकून त्या मिश्रणाला थंड करावं. त्यात जायफळ पावडर टाकून मँगो पल्प टाकून मिश्रणास थंड करावं. आयत्या वेळी त्यात ऑरेंज ज्युस टाकून नीट मिक्स करून र्सव्ह करावं. ऑरेंल ज्युस अगोदर टाकल्यास मँगोची चव येईल म्हणून ज्युस सगळ्यात शेवटी टाकावा. त्यामुळे पिताना दोन्हीची चव लागेल.
क्रीम मिल्क शेक
साहित्य : १ वाटी दही २ वाट्या व्हेनीला आइस्क्रीम १ वाटी छोटे तुकडे केलेली फळं (स्टॉबेरी, सफरचंद, पपया) १ वाटी दूध.
कृती : एका भांड्यात दही आणि दूध
एकत्र मिक्स करावं. मिक्सरमधे व्हेनीला आइस्क्रीम टाकून मिक्स करावे. ज्याने थोडासा फेस येईल. हे मिश्रण दूध आणि दह्याच्या मिश्रणात
नीट मिसळावं. अगोदर तुकडे केलेली फळं
टाकून थंडगार र्सव्ह करावं. कॅलरी कॉन्शससाठी लो कॅलरी व्हॅनिला आइस्क्रीम टाकून बनवावे.
चॉकलेट ओटमिल ड्रिंक
साहित्य : १०० ग्रॅम लो कॅलरी चॉकलेट अधीर् वाटी ओट्स.
कृती : एका भांड्यात दूध आणि क्रीम मिक्स करून थोडंसं उकळवावं. त्यात चॉकलेट टाकून नीट मिश्रण मिक्स करून फ्रिजमधे थंड करावं. एका पॅनमधे साखर आणि ओट्स टाकून मंद गॅसवर ठेवावं. त्यास हलवू नये त्यामुळे साखर हळूहळू वितळून त्या बरोबर ओट्स मिक्स होतील. लगेच खाली उतरवून थंड करावं. थंड झाल्यावर हे थोडंसं कडक होईल. त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून ग्लासमधे टाकावेत. थंड करत ठेवलेले चॉकलेट मिक्स मिक्सरमधून काढून त्या ग्लासात र्सव्ह करावं. हेच ड्रिंक गरम पण र्सव्ह करता येतं. चॉकलेटचं मिश्रण फ्रिजमधे न ठेवता गॅसवर उकळी येईपर्यंत गरम करून ओट्स टाकलेल्या ग्लासमधे ओतून गरम र्सव्ह करावं. कॅलरी कॉन्शस लोकांसाठी थंडीमधे हे ड्रिंक खूप चांगलं आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट