गुलाबजाम हा प्रत्येक लग्नातला ठरलेला मिष्ठान्न असून अनेकांचा फेवरेट असतो. जळगाव शहरातील काही ठिकाणी ऑसम टेस्ट देणारा गुलाबजाम मिळतो. शहराच्या आसपासच्या खेड्या गावांमध्ये दुधाचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शहरात अनेक प्रकारचे मिष्ठान्न आणि दुग्धजन्य पदार्थ मिळतात.
गुलाबजाम म्हटलं की, सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. असा तोंडाला पाणी सोडणारा गुलाबजाम विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्ध्रतीने बनविला जातो. यासाठी प्रत्येक ठिकाणची टेस्ट ही वेगळी ठरते.
सरस्वती डेअरी
जुनी सरस्वती डेअरीचा सॉफ्ट आणि स्पंजी गुलाबजाम खाल्याशिवाय एकही जळगावकर राहिला नसेल. कारण हा गुलाबजाम अतिशय सॉफ्ट आणि स्पंजी आहे. याचे कारण म्हणजे गायीच्या दुधाच्या खव्यापासून हे गुलाबजाम तयार केले जातात. त्यामुळे ते अधिक सॉफ्ट बनतात. ३६० रुपये किलोचा भाव असला तरी संध्याकाळपर्यत येथील गुलाबजाम संपून जातात.
दत्त डेअरीचा गुलाबजाम
कांताई हॉल जवळ असलेल्या दत्त डेअरीतील दुग्धजन्य पदार्थांपेक्षा गुलाबजामसाठी जास्त प्रसिद्ध आहे. येथे येणारा प्रत्येक ग्राहक गुलाबजाम घेतोच. म्हशीच्या दुधाच्या खव्याचे बनविलेले हे गुलाबजाम शुद्ध तुपात तळले जातात. त्यानंतर या गुलाबजामला गोड साखरेच्या पाकात टाकले जातात. त्यानंतर गुलाबजाम तयार होतात. २६० रुपये किलो प्रमाणे विकले जाणारे हे गुलाबजाम कमी किमतीत टेस्टी आणि हेल्दी ठरतात.
गुजरातचा काला जामून
गुलामजामच्या तोडीस तोड देणारा गुजरात स्विट्सचा काला जामून बिना पाकचा असतो. गुलाबजाम तयार झाल्यानंतर काही वेळ साखरेच्या पाकात बुडवून ठेवले जातात. त्यांनतर पाकातून काढले जातात. साखरेच्या पाकात बुडवून ठेवल्याने साखरेचा गोडवा आतपर्यत जातो आणि गुलाबजामला टेस्ट येते. २८० रुपये किलो प्रमाणे हा कालाजाम विकला जातो. ग्राहकांनाही हा काला जामून आवडतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट