Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

आनंदानं खातो आणि खिलवतोही

$
0
0

अंशुमन विचारे, अभिनेता

प्रत्येक पदार्थाची विशिष्ट अशी चव असते, गंध असतो. जातीचा खवय्या आहे मी. कोणत्याही पदार्थाचा मी मनापासून आनंद घेतो. अगदी नकळत्या वयापासूनच माझ्यावर खवय्येगिरीचे संस्कार झालेत. आई अफलातून स्वयंपाक करायची. मी तिच्यासोबत स्वयंपाकघरात सावलीसारखा असायचो. 'लाजवाब' या एकाच शब्दात मी आईच्या हातच्या स्वयंपाकाचं वर्णन करू शकतो.

नॉनव्हेज बनवण्यात आईचा हातखंडा होता. तेलातली मांदळी, बोंबील फ्राय, पापलेट फ्राय, मटण चिकन सारं ती मस्त करायची. माझा उपवास असला, की आई गोड वरण भात, डाळिंबी उसळ, कोथिंबीर बनवायची. आज आईच्या आठवणीनं मी माझ्याही नकळत नॉस्टॅल्जिक होतो.

पुण्याला वाकडजवळचं 'राधा' माझं सर्वांत लाडकं आहे.

पनीर क्रिस्पी, मुर्ग मुस्सलम, अफलातून मिळतं तिथं. चिंबोरीचं कालवण खायचा मूड आला, की 'निसर्ग'ला जातो.

तर्रेदार रस्सा आणि भरलेल्या चिंबोऱ्या स्वर्गसुख देतात. 'फिश करी राइस'ला जायचा प्लॅन कधीपासून रखडलाय. बोरिवलीला शिंपोली टेलिफोन एक्स्चेंजजवळ सावंताच्या हॉटेलमध्ये मिळणारे कोंबडी वडे एकदम टॉप क्लास.

तिसऱ्या मसाला

साहित्य : एक मोठी वाडी तिसऱ्याचा गर, एक चमचा गोडा मसाला, दोन कांदे, एक टोमॅटो, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, एक चमचा तिखट, एक चमचा हळद, एक चमचा मालवणी मसाला, तेल, मीठ चवीप्रमाणे.

कृती : उकळत्या पाण्यात साफ केलेल्या तिसऱ्यामधला गर शिजवून घ्यावा. तापलेल्या तेलात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो शिजवून घ्यावा. त्यात हळद, तिखट, मालवणी मसाला, गोडा मसाला, आलं लसूण पेस्ट घालावं. पाच ते दहा मिनिटानंतर मसाल्याला कडेकडेनं तेल सुटू लागल्यावर त्यात तिसऱ्यामधला गर घालावा. मीठ घालून अलगद ढवळावं. पाच मिनिटांनी तिसऱ्या मसाला तयार.

शब्दांकन : निनाद पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>