मीनल मुळ्ये, डोंबिवली
साहित्य : पोहे, खोवलेलं खोबरं, हिरव्या मिरच्या, कांदा, कोथिंबीर, लिंबू, मीठ कृती : कांदा, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यावं. दडप्या पोह्यांसाठी शक्यतो जाड पोहे वापरावे. हे पोहे जराशा पाण्यात भिजवावे. किंवा फार मऊ नको असतील तर त्यावर सरळ पाण्याचा एक हबका मारावा. मग त्यात खोबरं, कांदा, कोथिंबीर, मिरची आणि मीठ घालून कालवून घ्यावेत. वरून लिंबू पिळावं. लगेचच खायला द्यावेत. जास्त काळ ठेवून दिल्यास पोहे वातड होण्याचा धोका असतो. तुम्हाला आवडत असेल तर यात भाजलेला पापडही कुस्करून घालता येऊ शकतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट