ब्राऊन केक
ब्राऊन केक बनविण्यासाठी ब्राऊन ब्रेड स्लाइस, आवडीचा जॅम, मेल्ट केलेले चॉकोलेट आणि सारखेचा पाक घ्यावा. ब्राऊन ब्रेडच्या स्लाइसच्या कडा कापून त्याला गोल आकारात कापत अशा त स्लाइस तयार कराव्यात. त्यानंतर जॅम घेऊन ते स्लाईसला लावावे. एकावर एक स्लाइस ठेवून सर्वात वर जॅम न लावलेली स्लाइस ठेवावी. मेल्ट केलेले चॉकलेट साखरेच्या पाकात मिसळून जॅमप्रमाणे ते स्लाइसवर लावून थोडा वेळ फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावे. सेट झाल्यावर त्यावर ड्रायफुटस, चेरी लावून सर्व्ह करा.
ऑरेंज केक
दोन वाटी मैदा, पाऊण वाटी लोणी, एक वाटी साखर, बेकिंग पावडर आणि एक संत्रे या केकसाठी घ्यावे. साखर आणि लोणी एकत्र करून पांढरा रंग येईपर्यंत फेटावे. मैदा, मीठ, बेकिंग पावडर एकत्र करून चाळणीतून चाळून घ्यावे व त्यात संत्र्याची साल किसून घालावी. नंतर संत्र्याचा रस लोणी आणि सारखेच्या मिश्रणात मिसळून हे मिश्रण फेटून घ्यावे. यावेळी मिश्रणात अंजीर, बदाम, चेरी, काजू, पिस्ता यांचे तुकडे टाकावेत. केकच्या भांड्याला लोणी लावत त्यावर मैदा भुरभुरून त्यात हे मिश्रण टाकून
ओव्हनमध्ये १८० ते २०० अंश तापमानाला केक बेक करुन घ्यावा.
कोकोनट पेस्ट्री
दोन नारळ, पाव किलो मैदा, अर्धी वाटी खवा, पाच वाटी साखर, आठ चमचे लोणी, अर्धा चमचा बेकिंग पावडर कोकोनट पेस्ट्रीसाठी घ्यावे. नारळ खवून त्यात मैदा आणि दूध घालून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. मैदा चाळून त्यात फेटलेले लोणी व साखर घालावी. मीठ आणि बेकिंग पावडर घालून हे मिश्रण दोन तास झाकून ठेवावे. केकपात्राला तूप लावून त्यात हे मिश्रण ओतावे. ओव्हन किंवा गॅसवर बेक करुन या केकचे त्रिकोणी तुकडे करावेत. क्रीमने सजवून पेस्ट्री सर्व्ह करावी.
कॉफी आईस्क्रिम
५०० ग्रॅम दुधात कॉफी व साखर घालून गरम करायला ठेवावे. दूध कोमट झाल्यावर दीड कप दुधात कॉर्नफ्लॉवर मिक्स करावे. बाकीच्या दुधाला उकळी आली की त्यात हे मिश्रण परत उकळवून घेत फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे. अर्धवट सेट झाल्यावर क्रीम टाकून हलक्या हाताने फेटून परत फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे. आइस्क्रिम सेट झाल्यावर सर्व्ह करताना त्यावर किसलेले चॉकोलेट घालून सर्व्ह करावे.
मार्बल आइसक्रीम
यासाठी लीटर दूध, एक कप फ्रेश क्रीम, मिक्स फ्रूट जॅम, विविध फळांचे काप, साखर, मिक्स फ्रूट इसेन्स घ्यावा. दुधात साखर घालून गॅसवर ठेवून उकळून थीक मिल्क सारखे होऊ द्यावे. दाटसर तयार झाल्यावर गार करून त्यात क्रीम घालून हलक्या हाताने फेटा, फेटताना भांड्याखाली बर्फाचे तुकडे ठेवा. आइस्क्रिम फेटताना इसेन्स टाकून सेट होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. अर्धवट सेट झाल्यावर पुन्हा फेटावे आणि फेटून झाल्यावर हलक्या हातांनी जॅम मिक्स करावा. जॅमचे लेअर दिसायला हवेत. पुन्हा सेट करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे. कापलेली विविध फळे वरती घालून हे आईस्क्रिम सर्व्ह करावे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट