Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

ब्रेड उपमा करून 'तिने' जिंकला अमेरिकन फूड शो

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

अमेरिकेतल्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या चॉप्ड या फूड रिअॅलिटी शोमध्ये मुंबईकर शेफ आरती संपत हिने पहिला क्रमांक पटकावला आहे. ब्रेड ही थीम देऊन अवघ्या वीस मिनिटांमध्ये छान पदार्थ बनवण्याचे अंतिम फेरीतील आव्हान आरतीने अनोखा ब्रेड उपमा तयार करून पूर्ण केले. हा उपमा परीक्षकांना इतका आवडला की, त्यांनी आरतीला या शोची विजेती म्हणून घोषित केलं.

अमेरिकेतील मिशलॅन या हॉटेल रेंजमधील स्टार शेफ विकास खन्ना यांच्या जुनून या रेस्टॉरंटमध्ये मुख्य शेफ म्हणून काम करणारी आरती जयपूरमधील इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधून पदवीधर आहे. ताज ग्रुपच्या हॉटेलमधून तिनं ट्रेनी म्हणून करिअर सुरू केलं होतं. त्यानंतर वेगवेगळी तंत्र आत्मसात करत तिनं थेट अमेरिकन शो जिंकण्यापर्यंत मजल मारली आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेत प्रक्षेपित झालेल्या मेगा फायनलमध्ये आरतीची रेसिपी दाखवण्यात आली. तिला अंतिम फेरीमध्ये सरप्राइज राउण्डला समोरे जावे लागले. त्यात तिला मिळालेल्या पदार्थांमध्ये चायोटी (लांब काठीच्या आकाराचा ब्रेड) बरोबर, टेलफीश, कुकीज बटर कप आणि लसणाचा समावेश होता. आता अचानक मिळालेल्या या पदार्थांमधून २० मिनिटांमध्ये काय बनवायचे याचा विचार करत असतानाच तिने थेट ब्रेड उपमा बनवण्याचा निर्णय घेतला. काही मिनिटांमध्ये ब्रेडचा भूगा करून तिने ब्रेड उपमा केला. माझ्या आईच्या स्वयंपाक कलेला मी या रेसिपीतून सलाम करण्याचा निर्णय घेतला. मासा फ्राय करून गार्लिक चॉकलेटमध्ये तिने ही डिश सर्व्ह केली. तर आधीच्या राऊण्डमध्ये तिने केरळमधील बटर पेपर गार्लिक विथ स्नेल अॅण्ड कॉर्न शॉर्ट ही डिश तयार केली होती.

आपल्या स्वयंपाकाच्या शैलीवर मुंबईचा खूप मोठा प्रभाव असल्याचे आरतीने अभिमानाने आणि आनंदाने सांगितले. मुंबईतील अनेक पदार्थांवर मी खूप प्रयोग करते. उदाहरणार्थ, वडापावच्या वड्याच्या वेष्टनामध्ये लसणाच्या चटणीमध्ये मॅरीनेट केलेला ऑक्टोपस भरून ऑक्टोपस वडे नावाच प्रकार आरतीने शोधून काढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>