चॉकलेट मग केक
साहित्य- पाव कप मैदा, २ मोठे चमचे कोको पावडर, १ चिमूट बेकींग पावडर, २ मोठे चमचे साखर, १ चिमूट मीठ, दीड कप दूध, २ मोठे चमचे तेल
कृती-सर्वात प्रथम मैदा, कोको पावडर, बेकींग पावडर, साखर, मीठ एकत्र करा. त्यामध्ये दूध आणि तेल घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. मिश्रणामध्ये एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या. मायक्रोवेव्हसाठी योग्य अशा मगमध्ये मिश्रण ठेऊन ७० सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुमचा चॉकलेट मग केक खाण्यासाठी तयार.
गाजराचा मग केक
साहित्य- पाव कप मैदा, १ चमचा साखर, अर्धाचमचा दालचिनी पावडर, १ चिमूट जायफळ पावडर, अर्धा चमचा बेकींग पावडर, चिमूटभर मीठ, १ चमचा नारळाचं तेल, १ मोठा चमचा दूध, १ खिसलेलं गाजर
कृती- मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यासाठी योग्य अशा मगमध्ये मैदा, साखर, दालचिनी पावडर, जायफळ पावडर, बेकींग पावडर, मीठ एकत्र करुन घ्या. हे सगळं मिश्रण तेल आणि दूध घालून एकजीव करुन घ्या. सर्वात शेवटी खिसलेलं गाजर घाला आणि हे मिश्रण साधारण ९० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा.
ब्लू बेरी मग केक
साहित्य- २ मोठे चमचे बटर, अडीच चमचे साखर, २ मोठे चमचे दूध, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा चमचा बेकींग पावडर, १ मोठा चमचा मैदा, ७-८ ब्लू बेरीज
कृती- सर्वात प्रथम बटर, साखर, दूध, व्हॅनिला इसेन्स हे सगळं एकत्र करा. नंतर त्यामध्ये बेकिंग पावडर आणि मैदा घाला. सर्वात शेवटी त्यामध्ये ब्लू बेरी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण एका मगमध्ये घालून सेट करा. मात्र हे मिश्रण अर्धा मगच भरा. कारण केक बनून तो थोडा फुलतो. हे मिश्रण साधारण ९० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि अशाप्रकारे तुमचा केक तयार.
फनफेटी मग केक
साहित्य- पाव कप मैदा, २ चमचे साखर, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा बेकींग पावडर, पाव कप नारळाचं दूध, दीड कप नारळांचं तेल, २ चमचे स्प्रिंकल्स
कृती- सर्वात प्रथम मैदा, साखर, मीठ आणि बेकींग पावडर एकत्र करुन घ्या. यामध्ये हळूहळू दूध आणि तेल घाला. मिश्रण एकजीव होईपर्यंत एकत्र करत राहा. शेवटी मिश्रणात स्प्रिंकल्स घाला. मिश्रण साधारण ८०-९० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. केक तयार झाल्यावर त्यावर गार्निशिंगसाठी स्प्रिंकल्स घाला.
टीपः मायक्रोवेव्हमध्ये मग केक बनण्यासाठी साधारण ५० ते ९० सेकंद लागतात. जर ते केक व्यवस्थित न भाजल्यास १५ सेकंद आणखीन ठेवा.
संकलन- शब्दुली कुलकर्णी, कॉलेज क्लब रिपोर्टर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट