Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 1266 articles
Browse latest View live

बटाट्या तळासणी

$
0
0

साहित्य - सहा बटाटे, मोहरी-जिरे फोडणीसाठी, चमचाभर हळद, आठ-दहा लसूण पाकळ्या, मीठ चवीप्रमाणे, खोबरेल तेल

कृती - बटाटे सोलून फ्रेंच फ्राइजप्रमाणे कापून घ्यावेत. स्वच्छ धुवून सुती कापडानं कोरडे करून ठेवावेत. कढईत खोबऱ्याचं तेल घालून ते तापल्यावर मोहरी-जिरं आणि ठेचलेला लसूण घालावा. त्यावर हळद आणि बटाट्याचे लांब काप घालावेत. कढईवर झाकण ठेवून त्यात पाणी घालून वाफेवर ठेवावं. थोड्या वेळानं बटाटे खरपूस शिजून सोनेरी रंगावर आले, की गॅस बंद करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लो कॅलरीज ड्र‌िंक्स

$
0
0

विवेक ताम्हाणे

उन्हाळा असो वा हिवाळा आपल्याला कॅलरीजची गरज लागते. म‌ात्र, या कॅलरीज प्रमाणात असाव्यात हेसुद्धा पहावे लागते. उन्हाळ्यात सातत्यानं आपल्याला पातळ पदार्थ घ्यावे लागतात. त्यावेळी केवळ पाणी पिवून चालणार नाही. चहा, हॉट चॉकलेट, ज्यूस, शेक प्यायल्यास कॅलरीज वाढतात. इथे दिलेल्या रेसिपीज कॅलरी कॉन्शस असणाऱ्यांना आणि सर्वांना करण्यासारख्या आहेत.

ग्रीन टी

साहित्य : पाव वाटी ग्रीन टी लिव्ज २ चमचे साखर १ चमचा लिंबाचा रस २ वाट्या थंड पाणी अधीर् वाटी गरम पाणी पाव चमचा दालचिनी पावडर.

कृती : एका भांड्यात गरम पाणी आणि ग्रीन टी टाकून थोडंसं उकळवावं. थंड झाल्यावर गाळून घेऊन त्यात २ वाट्या थंड पाणी आणि थोडासा बर्फ टाकावा. त्यात साखर लिंबाचा रस आणि दालचिनी पावडर टाकावी. सर्व एकत्र मिसळून थंड र्सव्ह करावं. या रेसिपीमधे साखरेच्या ऐवजी डायबिटिक शुगर किंवा लो-कॅलरी शुगर वापरून डायबिटिक पेशण्टसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

मँगो-ऑरेंज शेक

साहित्य : अधीर् वाटी मँगो पल्प १ वाटी ऑरेंज ज्यूस १ वाटी क्रीम १ वाटी दूध अर्धा चमचा जायफळ पावडर १ चमचा साखर १ अंडं

कृती : एक वाटी दूध गरम करून

त्यात अंडं आणि साखर टाकून मंद गॅसवर जरा जाड होईपर्यंत ढवळत राहावं. नंतर त्यात थंड क्रीम टाकून त्या मिश्रणाला थंड करावं. त्यात जायफळ पावडर टाकून मँगो पल्प टाकून मिश्रणास थंड करावं. आयत्या वेळी त्यात ऑरेंज ज्युस टाकून नीट मिक्स करून र्सव्ह करावं. ऑरेंल ज्युस अगोदर टाकल्यास मँगोची चव येईल म्हणून ज्युस सगळ्यात शेवटी टाकावा. त्यामुळे पिताना दोन्हीची चव लागेल.

क्रीम मिल्क शेक

साहित्य : १ वाटी दही २ वाट्या व्हेनीला आइस्क्रीम १ वाटी छोटे तुकडे केलेली फळं (स्टॉबेरी, सफरचंद, पपया) १ वाटी दूध.

कृती : एका भांड्यात दही आणि दूध

एकत्र मिक्स करावं. मिक्सरमधे व्हेनीला आइस्क्रीम टाकून मिक्स करावे. ज्याने थोडासा फेस येईल. हे मिश्रण दूध आणि दह्याच्या मिश्रणात

नीट मिसळावं. अगोदर तुकडे केलेली फळं

टाकून थंडगार र्सव्ह करावं. कॅलरी कॉन्शससाठी लो कॅलरी व्हॅनिला आइस्क्रीम टाकून बनवावे.

चॉकलेट ओटमिल ड्रिंक

साहित्य : १०० ग्रॅम लो कॅलरी चॉकलेट अधीर् वाटी ओट्स.

कृती : एका भांड्यात दूध आणि क्रीम मिक्स करून थोडंसं उकळवावं. त्यात चॉकलेट टाकून नीट मिश्रण मिक्स करून फ्रिजमधे थंड करावं. एका पॅनमधे साखर आणि ओट्स टाकून मंद गॅसवर ठेवावं. त्यास हलवू नये त्यामुळे साखर हळूहळू वितळून त्या बरोबर ओट्स मिक्स होतील. लगेच खाली उतरवून थंड करावं. थंड झाल्यावर हे थोडंसं कडक होईल. त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून ग्लासमधे टाकावेत. थंड करत ठेवलेले चॉकलेट मिक्स मिक्सरमधून काढून त्या ग्लासात र्सव्ह करावं. हेच ड्रिंक गरम पण र्सव्ह करता येतं. चॉकलेटचं मिश्रण फ्रिजमधे न ठेवता गॅसवर उकळी येईपर्यंत गरम करून ओट्स टाकलेल्या ग्लासमधे ओतून गरम र्सव्ह करावं. कॅलरी कॉन्शस लोकांसाठी थंडीमधे हे ड्रिंक खूप चांगलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळांची बासुंदी

$
0
0

साहित्य- दोन लिटर दूध, दोन केळी, दोन संत्री, एक मोठे सफरचंद, शंभर ग्रॅम बिनबियांची द्राक्षे, दोन वाट्या अननसाचे तुकडे (कमी चालतील), एक मोठा चमचा साजूक तूप, पंचवीस ग्रॅम काजू, पंचवीस ग्रॅम बेदाणा, पंचवीस ग्रॅम बदाम, सव्वा वाटी साखर, चार वेलदोडे पूड.

कृती- दूध निम्मे होईपर्यंत आटवावे. त्यात साखर घालून पाच मिनिटे गॅसवर ढवळावे. खाली उतरवून गार होऊ द्यावे. द्राक्षे पाण्यात भिजत ठेवावी. बेदाणा वेगळ्या भांड्यात तासभर भिजत ठेवावा. काजू साफ करून ठेवावे. बदामाचे जाड तुकडे करावे.बासुंदीत वेलचीपूड मिसळावी व फ्रीजमध्ये ठेवावी. छोट्या कढईत साजूक तुपात काजू व बदामाचे तुकडे परतावे. त्यात भिजवून धुतलेला बेदाणा अलगद परतावा. गार बासुंदीत हा मेवा घालावा. संत्री सोलून त्याच्या फोडी सुट्या कराव्या. वरचा पापुद्रा काढून फोडीचे दोन किंवा तीन लहान तुकडे करावे. सफरचंदाची साल व बिया काढून बारीक तुकडे करावे. केळ्याच्या छोट्या अर्धचंद्राकृती चकत्या कराव्या सर्व फळे बासुंदीत मिसळावी. दूध जास्त हवे असल्यास थोडे कंडेन्स्ड मिल्क घालावे. घाईगडबड असल्यास कंडेन्स्ड फळे व मेवा घालावा. मात्र साखर वगळावी व दाटसर वाटल्यास थोडे साईसकट दूध किंवा क्रीम घालून मिश्रण सरबरीत करावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चवळी भात

$
0
0

साहित्य- एक वाटी चवळी, एक वाटी तांदूळ, आले लसूण वाटण, फोडणीचे साहित्य, तेल, चवीनुसार मीठ, कोथिंबीर

कृती- चवळी कुकरमध्ये थोड्या जास्त पाण्यामध्ये शिजवावी आणि थंड करावी. भात करून थंड होऊ द्यावा आणि मोकळा करावा. तेल तापवून ते धुरावल्यावर ज्योत बारीक करून मोहरी, जिरे, ओवा, हळद, लाल तिखट यांची फोडणी करावी. ओवा थोडा सढळ हाताने घालावा. त्यात आले-लसूण वाटण घालावे आणि पटापट हलवावे.

त्यात शिजवलेली चवळी (पाण्यासकट) घालावी आणि ज्योत मोठी करून फोडणी सगळ्या चवळीला लागेलसे हलवावे. त्यात भात घालून सगळे नीट एकजीव करावे. पाणी थोडे जास्त असू द्यावे. पातळ खिचडी (वा बिसी बेळे भात) यासारखा प्रकार ठेवावा. मिश्रण रटरटू लागले की गॅस बारीक करून जरूरीपुरते मीठ घालावे आणि नीट हलवावे. पाच मिनिटांनंतर गॅस बंद करून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काजू कतली

$
0
0

साहित्य - शंभर ग्रॅम काजू, दोन चमचे मलई, एक वाटी काजू पावडर, एक चमचा तूप, चंदेरी वर्ख

कृती - प्रथम काजू मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत. त्यात पिठीसाखर टाकावी त्यानंतर मलई घालून ते मिश्रण मिक्सरमध्ये एकत्र करून घ्यावे. नंतर कढईमध्ये तूप घेऊन त्यात हे मिश्रण परतून घ्यावे. घट्टपणा येईपर्यंत हे मिश्रण परतत राहावे. नीट परतून झाल्यावर हे मिश्रण गार होऊ द्या. त्यानंतर लाटण्याला व पोळपाटाला तूप लावून गार झालेले मिश्रण त्यावर लाटून घ्या. नंतर त्यावर चंदेरी वर्ख लावून त्याचे काप करा. काजू कतली सर्व्ह करण्यासाठी तयार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉटरमेलन गाटो

$
0
0

साहित्य - १ वाटी मैदा, १ वाटी साखर, १ टी स्पून बेकिंग पावडर, २ अंडी, १/२ स्पून व्हॅनिला इसेन्स, पाव वाटी तेल, कलिंगडाचे ज्युस आणि काही तुकडे, व्हिपिंग क्रिम

कृती - प्रथम एक भांड्यात तेल, अंडी आणि साखर घालून व्यवस्थित फेटून घ्यावे. त्यात मैदा, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स घालून परत छान फेटून घेणे. हे सर्व मिश्रण ग्रिसिंग केलेल्या भांड्यात हळूवार ओतून साधारण प्रिहीट केलेल्या ओवनमध्ये १७५%c वर ३० ते ३५ मिनिटे ठेवावे. केक बनल्यावर तो छान गार होऊ द्यावा. मग त्याचे मधोमध दोन भाग करून घ्यावे. त्यात दोन्ही भागांवर कलिंगडाचे ज्युस थोडे पसरून टाकावे. त्यावर क्रीम पसरवावे. वरून काही कलिंगडचे तुकडे घालावे. मग केकचा दुसरा भाग त्यावर ठेवून पुन्हा क्रिक व्यवस्थित लावून घ्यावे. त्यावर कलिंगडाचे तुकडे घालून सजवावे. फ्रीजमध्ये साधारण दोन तीन तास छान सेट होण्यास ठेवावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊसाचा रस

$
0
0

जळगाव टाइम्स टीम

ऊसाचा रस हे उन्हाळ्यातील पेय असलं तरी, हल्ली कोणत्याही सिझनमध्ये हमखास मिळते. या रसाचा चाहतावर्गही भरपूर मोठा आहे. अनेक अर्थांनी बहुगुणी असलेला हा ऊसाचा रस कावीळ सारख्या आजारावर रामबाण उपाय मानला जातो. जळगाव शहरात चौका-चौकात हे टेस्टी हेल्दी एनर्जी ड्रिंक उपलब्ध असते.

जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये अनेक रसवंत्यांवर ऊसाचा थंडगार रस मिळतो. या रसाला वेगवेगळे फ्लेवर्स दिले जातात. यात कधी आईसक्रीम टाकले जाते तर कधी लिंबू पिळून ऊसाच्या रसाला वेगळी टेस्ट दिली जाते. उन्हाळ्यात शरीरात पाणी आणि ग्लुकोजचे बॅलन्स असणे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असते. ऊसाच्या रसमुळे या दोघांचा योग्य समतोल शरीरात राहतो. लहान मुलांसाठी एनर्जी ड्रिंक म्हणून ऊसाचा रस फायदेशिर असतो. बाजारात मिळणाऱ्या कोल्ड्रींक्सपेक्षा ऊसाचा रस कधीही बेस्ट ठरतो.

विविध टेस्ट उपलब्ध

प्लेन ऊसाच्या रसची टेस्टीही छान असते. मात्र यात लिंबुचा रस किंवा आले, पुदीन्याच्या रसाने देखील वेगळी टेस्ट उपलब्ध करून दिली जाते. या फ्लेवर्समुळे ऊसाचा रस टेस्टीसह हेल्दी ठरतो. लिंबू, पुदिना आणि आल्याचा रस ऊसाच्या रसात मिक्स केल्याने उन्हाचा त्रास कमी होऊन शरीरासाठी फायदेशिर ठरते.

ऊसाचा रस लाभकारक आहे. पण तो स्वच्छ आणि ताजा असावा. कारण यात साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे बॅक्टेरियाचा फटका बसतो. त्यामुळे साथीचे आजार पसरतात. बाहेर मिळणाऱ्या कोल्ड्रींक्समध्ये कार्बोनेटेड वॉटर असल्यामुळे अन्न पचत नाही, यासाठी कोल्ड्रींक्स टाळावे. - डॉ. नाहीद देशमुख, डायजेशियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

के‍ळीसाबुदाण्याच्या चिकोड्या

$
0
0

साहित्य - कच्ची केळी, ‌साबुदाणा,‌ जिरं, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट

कृती - कच्ची केळी शिजवून ती गार झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यावी. त्यात मावेल इतका साबुदाणा भिजवून ठेवावा. जिरं, मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट घालून ते मिश्रण तयार कराव. याच्या छान चकल्या पाडाव्या. या चकल्यांमध्ये बटाटा घालू नये. उन्हाने खरपूस तापून निघालेल्या केळीसाबुदाण्याच्या या दणदणीत फुलणाऱ्या चिकोड्या वर्षभर टिकतात. त्या तळून घेतल्या तर साधा वरणभातही बहारदार होऊन जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डाळीचे वडे

$
0
0

साहित्य- चणा डाळ, तिखट, मीठ, हिंग, हळद, धनेजिरे पूड

कृती - चण्याची डाळ रात्री भिजत घालावी. चांगली भिजल्यावर सकाळी जाडसर वाटून घ्यावी. त्यात चवीनुसार आणि आवडीनुसार तिखट, मीठ, हिंग, हळद, धने-जिरे पूड घालून मिश्रण करावं. आता या मिश्रणाचे लहान बोराएवढे गोळे करून ते प्लॅस्टिकवर किंवा पाटावर वाळत टाकावेत. खडखडीत होईपर्यंत सुकवावेत. या वाळवणाच्या वड्यांची तुम्ही भाजी करू शकता. पण भाजी करण्याच्या आधी ते पुन्हा तळून किंवा शिजवून घेणं गरजेचं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बर्फीला रे...!

$
0
0

मी म्हणणारं ऊन, हैराण करणाऱ्या घामाच्या धारा.... हे सगळं विसरुन चेह‍ऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतो, जेव्हा हातात थंडगार बर्फाचा गोळा असतो!

उन्हाळ्यासाठी इतर थंडपेयांची कितीही नवी उत्पादनं बाजारात आली तरी थंडगार बर्फगोळा आणि सोड्याला पर्याय नाही. दर उन्हाळ्यात नवनव्या फ्लेवर्समध्ये येणारी गोळा आणि सोड्याची ही जोडगोळी कायमच हिट ठरली आहे.

मला एक जांभूळ द्या... काका त्या पेरूचे किती झाले?... ए पटकन ते अननस पास कर तिकडे....

हे संवाद काही फळबाजारातले नाहीत. तर सोड्याच्या दुकानातले आहेत. बाटलीतून फसफसून बाहेर येणारा सोडा जिभेवर फक्त झिणझिण्या आणायचा. पण आता मात्र हा सोडा विविध चवीढवींचा स्वाद घेऊन येताना दिसतो. आबा, लिंबू, जिरे, संत्र यासारख्या फळांसोबतच कच्ची कैरी, करवंद, जांभूळ, डाळिंब, अननस, लीची, स्ट्रॉबेरी, खस, ब्लू लगून, चिक्कू, आवळा, कोकम, पेरु अशा इतर फळांच्या स्वादाच्या सोड्याची मागणीही यंदा वाढली आहे. गंमत म्हणजे काकडी आणि गाजराच्या स्वादाचा सोडाही लोक आवडीने पीत असल्याचं दुकान मालक सांगतात.

तरुणाईला यंदा नैसर्गिक चवीने भुरळ घातली आहे. त्यामुळे फ्लेवर्ड सोडा पिण्याऐवजी फळांपासून बनवलेला सोडा पिणा‍ऱ्यांची संख्या वेगाने वाढत असल्याचं 'गारवा'चे मंदार पाध्ये सांगतात. इतकंच नव्हे तर घरी आलेल्या पाहुण्यांना साध्या सरबताऐवजी, सोड्यातून सरबत देण्याची नवीन कल्पनाही सध्या तेजीत आहे.

गोळा है सदा के लिए...

चम्मच गोळा, काडी गोळा, प्लेट गोळा अशा निरनिराळ्या प्रकारात मिळणारा बर्फाचा गोळा थेट बालपणात घेऊन जातो. आता बरेच प्रकार या बर्फाच्या गाडीवर आलेले दिसतात. मलई, मावा, बादशाही गोळा असे शाही स्वाद आता बर्फाच्या गोळ्यामध्ये मिळू लागले आहेत. अगदी ३० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत हा बर्फगोळा मिळतो. आईस्क्रीम फ्लेवर गोळा म्हणजे तर टू इन वन चवीची पर्वणीच. त्यात बटरस्कॉच, चॉकलेट, गुलाब असे भन्नाट स्वाद आहेत. तेही आपल्या बजेटमध्ये. यासोबतच पेप्सी, कोला, लेमन अशा चवीच्या गोळ्यांनाही चांगली पसंती मिळतेय.

संकलन - सुस्मिता दळवी, दीपश्री आपटे, स्वप्निल घंगाळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्यूब’ खाना कोल्हापुरात

$
0
0

अनुराधा कदम, कोल्हापूर

युरोपमधील चविष्ट पदार्थ आता कोल्हापूरच्या खवय्यांना वर्षातील ३६५ दिवस चाखायला मिळणार आहेत. कोल्हापुरातील रितेश दास आणि अमोल देव या तरूण मित्रांनी खास युरोपमध्ये जाऊन घेतलेल्या शिक्षणानंतर 'क्यूब' या युरोपियन रेस्टॉरंट चेनची देशातील पहिली शाखा कोल्हापुरात सुरू होत आहे. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये विशेष रस असलेल्या रोहित आणि अमोल यांनी खास तरूणाईच्या जिभेची चव ओळखून क्यूब हे युरोपियन फास्टफूड सुरू केले असून यूथफूल डिझाइन आणि हटके टेस्ट असे या क्यूबचे वैशिष्ट्य आहे. शनिवारपासून हे हॉटेल खुले होणार असून एक वेगळी टेस्ट घेऊन दोन तरूण खवय्येगिरीच्या क्षेत्रात प्रयोगशील पाऊल टाकत आहेत.

रोहित आणि अमोल हे मित्र. दोघांनाही कुकिंगमध्ये ​रस. आवडीला शास्त्रशुद्ध शिक्षणाची जोड देत त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट केले. त्यासाठी रोहित खास युरोपला जाऊन युरोपियन चवीचे पदार्थ शिकून आला. दरम्यान आता इतर देशांच्या विशेष चवीच्या पदार्थांनी हॉटेल्सच्या मेन्यूकार्डमध्ये दर्शन देण्यास सुरूवात केली आहे. कोल्हापुरात झणझणीत कोल्हापुरीसोबत इटालियन, चायनीज, थाई फूडस लोकप्रिय होत आहे. शिवाय पंजाबी, उडपी खाणारे अस्सल खवय्येदेखील आहेत. मुळातच खवय्ये असलेल्या कोल्हापूरकरांना नवीन चवीचे पदार्थ आवडतात. याच विचारातून रोहित आणि अमोल यांनी युरोपियन फास्टफूड रेस्टॉरंट सुरू करण्याचे ठरवले.

उचगाव परिसरातील हायवेवर सुरू होणाऱ्या क्यूब या रेस्टॉरंटमध्ये सँडविच, मिक्समॅच, चिकन आणि पिझ्झा या प्रकारातील व्हेज, नॉन व्हेज पदार्थ मिळणार आहेत. ​विशेष म्हणजे या रेस्टॉरंटमधील सर्वांत कमी किंमतीचा पदार्थ २५ रूपयांचा तर जास्तीत जास्त किंमतीचा पदार्थ १७५ रूपयांचा आहे. त्यामुळे युरोपियन फास्टफूड सेंटरमध्ये सामान्य खवय्यांनाही जिभेचे चोचले पुरवता येणार आहेत. या रेस्टॉरंटच्या डिझाइनची पद्धतही वेगळी असून क्यूब या रेस्टॉरंटच्या जगभरातील सर्व हॉटेल्सच्या नाविन्यपूर्ण सुविधा कोल्हापूरकरांना मिळणार आहेत.

वेगळ्या करिअरचा आनंद

हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून दुसऱ्या देशातील पदार्थ कोल्हापूरकरांना खाऊ घालण्याचा हा वेगळा प्रयोग आहे, असे रोहित आणि अमोलने सांगितले. नवीन चव लोकांच्या जिभेवर रुळवण्यासाठी आमच्या हॉटेलिंगच्या कौशल्याला आव्हान आहे. कोल्हापुरात अस्सल खवय्ये आहेत. त्यामुळे कोणताही पदार्थ चांगला आणि दर्जेदार बनवण्याचा कसोशीने प्रयत्न तर करुच, पण तरुणांनी नवनव्या क्षेत्रांकडे करिअर म्हणून पहावे यासाठी आम्ही ही वेगळी वाट निवडल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडा मतलब...!

$
0
0

उन्हाळ्याच्या या दिवसांत आइस्क्रीम, मिल्कशेक्स, थंडपेय याची अगदी रेलचेल असते. रोजच्या रोज न चुकता आइस्क्रीम खाणारेही अनेक खवय्येही आहेत. दर उन्हाळ्यात कोणती ना कोणती नवी चव आपल्या जिभेला खुणावत असते. यंदा कोणत्या नवनव्या चवी आणि स्वाद बाजारात आलेत त्यावर एक नजर...

मिल्कशेकचा पहिला घोट, सरबताचा पहिला थेंब आणि जिभेवर एंट्री घेताक्षणी गारेगार करून टाकणारं आइस्क्रीम.... डोक्यावरचं ऊनही बघता बघता या थंडगार चवीत विरघळून जातं. यंदाच्या उन्हाळ्यात या थंडाव्याला कोणते स्वाद मिळालेत त्याची एक झलक...

रंग शरबतोंका..

उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी सगळ्यात सोप्पा मार्ग ‌म्हणजे सरबतं. कैरी पन्हं, ताक, लिंबू सरबत, लस्सी अशा देशी सरबतांबरोबरच यंदा ब‍‍ऱ्याच परदेशी पाहुण्यांनी या शरबती विश्वात प्रवेश केला आहे. मोयितो, फ्रुट पंच, स्मुदीसारखी सरबतं यंदा बाजारात दिसून येतायत.

मोयितोची जादू

मोयितो हे एक स्पॅनिश पद्धतीचं सरबत आहे. यात व्हाईट रम असते. आपल्याकडे मात्र क्लब सोडा घालून मोयितो बनवतात. पुदिना, आंबा, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, लिची, संत्र अशा ब‍ऱ्याच स्वादांमध्ये मोयितो उपलब्ध आहेत. घरच्या घरीही तुम्ही हे मोयितो बनवू शकता.

साहित्य - १० ते १२ पुदिन्याची पाने, ४ ते ५ क्लब सोडा, ५ चमचे लिंबाचा रस, ५ ते ६ चमचे बर्फाचा क्रश, १ चमचा जलजीरा, अर्धा चमचा आलं, ५ चमचे साखरेचा पाक, पाणी आणि मध थोडंसं उकळून घ्या. मिश्रण घट्ट होत असताना पाक झाला असं समजावं.

कृती - एका ग्लासामध्ये पुदिन्याची पानं, क्लब सोडा, जलजीरा, साखरेचा पाक, लिंबाचा रस, आलं एकत्र करून घ्या. हे सगळं लाकडी चमच्याने ठेचून घ्यावं. ते करताना पुदिन्याची पानं खूप वाटली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सरतेशेवटी यात बर्फाचा चुरा आणि पाणी घालावं. लिंबाच्या चकत्या आणि पुदिन्याची पानं लावून सजवावं.

आइस्क्रीमची ओढ

उन्हाळा आणि आइस्क्रीम हे एक अतूट नातं. सध्या मात्र आइस्क्रीमच्या चवीमध्ये अनेक नवनवे स्वाद आलेले दिसतात. आंबा, व्हॅनिला, चॉकलेट, पिस्ता बदाम अशा नेहमीच्या चवींखेरीज मसाला पान, गुलकंद, मिरचीपर्यंत निरनिराळ्या चवीची आइस्क्रीम चाखायला मिळतील. यासोबतच थंडाई, राजभोग, गुलकंद असे स्वाद आहेत. तर फळांमध्ये आंब्याव्यतिरीक्त चिकू, नारळ, कलिंगड, पपई, सीताफळ, लिची, अननस, अंजीर, फणस, जांभूळ, कच्ची कैरी, टरबूजापर्यंत अनेक निरनिराळ्या चवी आपल्या जिभेच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. यासोबतच तीन चार फ्लेवर्स एकत्र करून दिलं जाणारं गडबड आइस्क्रीम, किंवा दह्याचं बनलेलं योगर्ट आइस्क्रीम खाणा‍ऱ्यांची संख्याही कमी नाही.

मिल्कशेकची जादू

आइस्क्रीमनंतर नंबर लागतो तो मिल्कशेकचा. घरातून बराच काळ बाहेर असताना कधीकधी भूकही लागते आणि तहानही. हे दोन्ही भागवणारा हुकुमी एक्का म्हणजे ‌मिल्कशेक. इतर वेळी दुधाला नाकं मुरडणारी मंडळी तेच दूध मिल्कशेकच्या रुपात आल्यावर मात्र अगदी आवडीने गट्टंम करतात. मिल्कशेकमध्येही आता एकदम भन्नाट स्वाद येऊ लागलेत. बडीशेप, कॉफी, स्ट्रॉबेरी, किवी विथ स्ट्रॉबेरी, मिल्कशेक विथ क्रश्ड क्रीम अशा निरनिराळ्या हटके प्रकारांची चलती आहे. सोबतच रबडी, बासुंदी, बनाना मिल्क, अंजीर, रासबेरी, ड्रायफ्रुट बेस मिल्कशेकसारख्या जुन्या प्रकारांनाही खवय्यांची पसंती आहेच. आइस्क्रीम आणि चॉकलेट बेस मिल्कशेकसुद्धा आहेतच. आइस्क्रीम किंवा चॉकलेट बेस्ड मिल्कशेकमध्ये आंब्याचे तुकडे किंवा आंब्याच्या रसाचा कल्पक वापर करून निरनिराळे मिल्कशेकचे प्रकार बनवले जात आहेत. याशिवाय दोन वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक एकत्र करून तयार केले जाणारा फ्युजन मिल्कशेकही खवय्यांची पसंती मिळवत आहेत.

रसायन

रसायन हा थोडा वेगळा प्रकार आहे. अगदी ३०-३५रुपयांपासून ते ४००रु. पर्यंत किंमतीत तो तुम्हाला मिळू शकतो. दक्षिण मुंबईमध्ये तर तो खूप जास्त लोकप्रिय आहे. या प्रकारात केळ हे मुख्य फळ आणि सोबत इतर ४-५प्रकारची फळं घातलेली असतात. रस्त्यावरच्या गाडीपासून ते चकाचक मॉलपर्यंत ब‍ऱ्याच ठिकाणी हा पदार्थ चाखायला मिळू शकतो.

आइस्क्रीम केक

वॉलनट ब्राऊनी बरोबर व्हॅनिला आइस्क्रीम अनेकांनी खाल्लं असेल. पण या उन्हाळ्यात वेगवगेळ्या स्वादाच्या केकबरोबर वेगवेगळी आइस्क्रीम्स चाखणा-यांची संख्या वाढल्याने विक्रेत्यांनी आइस्क्रीम केक हा नवीन प्रकार उपलब्ध करुन दिला आहे.

संकलन - प्राची आंधळकर आणि सुमेध म्हात्रे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या खा, बळकट व्हा

$
0
0

शर्मिला कलगुटकर

बाजारात मासे मिळण्याचे प्रमाण कमी होत असताना शिंपल्याचे चविष्ट प्रकार रांधता येतात. कॅल्शिअमचा सर्वात मोठा स्त्रोत असला तरीही मांसाहारामध्ये शिंपल्यांना मानाचं पान मिळालेलं नाही.

बाजारात मासे मिळण्याचं प्रमाण आटत गेलं तरीही माफक दरात शिंपल्याचा वाटा कोळणीने हमखास पाटीवर लावलेला असतो. भरती ओसरली की मऊ वाळूमध्ये लपून बसलेल्या या शिंपल्यांवर वाळूचे कण, माती चिकटलेली असते. म्हणूनच शिंपल्या बनवण्याआधी त्या खळखळून धुवून विळीवर निगुतीने साफ कराव्या लागतात. मात्र हा खटाटोप अनेकांना नको असतो. बहुदा म्हणूनच अतिशय रुचकर, कॅल्शियमचा ओतप्रोत स्त्रोत असलेल्या शिंपल्यांना मासांहारामध्ये म्हणावा तसा मान मिळालेला नाही. शिंपल्यांचे वर्गीकरण काही प्रकारांमध्ये केलं जातं. छोटे खुबे, खडबडीत आवरणाच्या तिसऱ्या, काळेशार पाठ असलेल्या शिवल्या...आकार अन् रूपावर तिसऱ्यांची चव ठरते. अस्सल शिंपलीखाऊ विळीवरच्या धारेवर मधोमध बरोबर चिरतो, अन् त्यातला गर काढून घेतो, त्यातलं थेंबभर पाणीही वाया जाऊ देत नाही. ज्यांना विळीवर शिंपल्या साफ करण्याचा तजुर्बा नाही, ते थेट शिंपल्या कुकरला लावून एक दोन शिट्ट्यांमध्ये वाफवून घेतात. या शिट्टी प्रकरणामध्ये एखादी शिंपली मातीचिखलाने बरबटलेली असेल तर सगळा मामला गढूळ होण्याची भीती!

सराव नसलेल्यांना विळीवर शिंपल्याऐवजी बोट चिरण्याची शक्यता अधिक, म्हणून वाफवून घेतलेल्या शिंपल्यातला पांढरट, पिवळसर गर बारीक चिरलेला कांदा, लसूण, आलं, भरपूर कोंथिबीर, हळद, कुटून टाकलेल्या मिरे आणि लाल तिखटासोबत नुसती परतवूनही झणझणीत भाजी करता येते. भाजीचा कच्चा फणस, ओले गर काढलेले काजू, शेवग्याच्या शेंगा, छोटे बटाटे, कच्च्या कैऱ्यांसोबत शिंपल्या फक्कड बनतात. खेकडे खाताना जसे दोन्ही हात खेकड्याच्या रश्श्याने भरून घेण्याची तयारी ठेवावी लागते, तसेच काहीसे कष्ट 'एकशिपी' हा शिंपलीचा प्रकार खाताना घ्यावे लागतात. गर असलेल्या बाजूचे शिंपलीचे कवच तसेच ठेवायचे आणि दुसरे काढून टाकायचे, या शिंपल्या साफ करताना गृहिणी शिंपली अशी साफ करते, की त्यातलं पाणी म्हणजेच एलवणे बाजूला निघेल. या एलवण्याची अख्खा गरम मसाला फोडणीला टाकून केलेली आमटी आणि शिंपल्याचा सुकं घट्ट कालवण व गरमागरम भात हे फ्राय माशाच्याही तोंडात मारणारे असते.

शिंपल्या साफ करताना गर वगळून निघालेले पाणी, वा उकडल्यानंतर राहिलेले पाणी बाजूला काढून ठेवायचे, त्याला एलवणे म्हणतात. भरपूर कडीपत्ता अन् लसूण, हिंग, हवी असल्यास हळदीची व कच्च्या गरम मसाल्याची फोडणी करायची की गरमागरम रस्सा तयार. रस्सा दाटसर-घट्ट हवा असेल तर कांदाखोबऱ्याचं वाटप लावायचं...शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्यासोबतही गरम मसाल्यामध्ये कोळंबीचा दाट रस्सा करतो त्या पद्धतीनेही शिंपल्याचं कालवण करता येतं. अस्सल चवीच्या खोबरेल तेलामध्ये केलेली तिसऱ्याची कोशिंबीरही अशीच लजीज असते. शिंपलीमधला गर उकडवून वेगळा काढून घ्यायचा, त्यात ओल्या नारळाचे पातळ काप बारीक करून घालायचे, हिरवी मिरची, भरपूर कोथिंबीर आणि थोडासा पुदिना बारीक चिरून घालायचा, वरून चिंचेच्या कोळाचा थोडासा हबका द्यायचा, खोबरेल तेलाच्या फोडणीमध्ये हळद घालून चुरचुरीत फोडणी दिली की मोजून पंधरा मिनिटांत ही कोशिंबीर तय्यार...नुस्त्या वरण भातासोबतही ती जीभेला चव देते.

शिंपलीचा कोणताही प्रकार रांधताना स्वच्छ धुवून घेतलेल्या शिंपल्या मोठ्या भांड्यात उकडवायला ठेवायच्या. तिसऱ्यांना सुटलेलं पाणी दुधासारखं भसाभसा ऊतू जातं, पाणी वाया गेलं तर चवच ती काय राहणार..तिसऱ्याच्या पाण्यात अंगभूत मीठ असतं, त्यामुळे रांधताना मीठ कमीच घालायचं, उकडवून घेतलेल्या तिसऱ्या पुन्हा फोडणीला घातल्यानंतर पुन्हा उकडवून घेतल्या तर त्या मसाल्यात चष्मा लावूनही शोधता येणार नाहीत ! शिंपल्या थोड्या आंबटसर असल्याने टॅामेटो अधिक घालण्याची गरज नाही. तिखटाचा हात थोडा सैल सोडला तर शिंपलीची हिमुस चवही लपून जाते. हाताशी भरपूर वेळ अन् हौस असेल तर ओल्या शिंपल्या केवळ प्लास्टिकवर वाळवून पुरवठ्यालाही आणता येतात. ओला गर काढून खोबरेल तेलाचा हात लावून खडबडीत उन्हात सुकवलेल्या शिंपल्या खोबरेल तेलावर परतल्या तरी मासांहारात तोंडीलावण म्हणून खाता येतात. या गराचे चपटे पैशासारखे सांडगेही घालतात. त्याला थिल्ले म्हणतात. खोबरेल तेलावर नुसते परतूनही ते खाता येतात. चिमुकल्या शिंपलीची ही बहुगुणी खाद्यांती आता तरी शिंपलीला कुणी चिमुकली म्हणून हिणवू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रानमेवा आला होऽऽऽ

$
0
0

पुणे टाइम्स टीम

जिभेवर हमखास चव रेंगाळेल, असा रानमेवा बाजारात दाखल होऊ लागला आहे. आंबट, गोड, तुरट अशा चवीच्या या रानमेव्यानं जणू अवघं रानच पक्व झालं आहे.

'डोंगरची काळी मैना.. आली हो'...अशी आरोळी घुमली, की घराघरांतून करवंद घेण्यासाठी लगबग उडायची. काळ्या मैनेचं हे कौतुक सध्या फक्त वाट्यावाट्यांनी मंडईत विकायला बसलेलं दिसतं. करवंदांसह बोरं, चन्यामन्या, रानजांभळं, आळू, आंबोळ्या, तोरणं, आमगुळे, रायआवळा अशा अस्सल मेव्यानं रान घमघमतं आहे. उपनगरीय भागातून थोडं बाहेर पडलात, की या रानमेव्याची मजा मनसोक्त लुटता येईल.

आंबा, फणस आणि करवंद या पलीकडचा रानमेवा हल्ली फारसा माहिती नसतो आणि खाल्लाही जात नाही. रानमेव्यातल्या प्रत्येक फळाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. हा रानमेवा गुणकारी तर आहेच; पण त्याची चव रसना तृप्त करणारीही आहे. आंबे, करवंद, फणस हे शहरात मिळतातच; पण आळू, रानजांभळं, आंबोळ्या, तोरणं यांचा आस्वाद घेण्यासाठी थोडंसं बाहेरही पडायला हवं. साधारण अक्षय तृतीयेनंतर ही फळं पक्व होऊन खाण्यासाठी उपलब्ध होतात. लाँग ड्राइव्हचा बेत आखला, तर पुण्याजवळच्या सगळ्या घाटमार्गांवर सध्या रानमेव्याचा तुम्हाला मनसोक्त आस्वाद घेता येईल.

काळी मैनाः डोंगरची काळी मैना हे करवंदाचं समर्पक नामकरण. कच्ची आणि पक्व करवंदं सध्या बाजारात दाखल झाली आहेत. लोहयुक्त करवंदं खाणं आणि त्याच्या चिकानं हात-तोंड माखून घेणं हा सगळ्यांच्याच आवडीचा उद्योग. कच्च्या करवंदाचं लोणचं भन्नाट होतं. पिकलेली करवंदं ही करवंदाच्या जाळीत जाऊन खाण्यातली मजा काही औरच.

तोरणं: सह्याद्रीत भटकणाऱ्यांना हे फळ अपरिचित नाही. सध्याच्या दिवसांत लालचुटूक रंगांचं हे फळ हमखास डोंगरदऱ्यात दिसतं. दिसायला चन्या-मन्यासारखं असणारं हे नाजूक फळ थोडसं पिठूळ असतं. याची भन्नाट चव चाखण्यासाठी रानवारी व्हायलाच हवी. अवचित जुन्या मंडईत एखादी आजी त्याचे वाटे विकताना दिसली तर तुम्ही नशीबवान.

आळूः आळूच्या झाडाची पानं ही पेरूच्या झाडासारखी असतात. त्यावर आळूची गोल-गोल फळं लागतात. पानशेत, वेल्हा, मुळशी, ताम्हिणी, भोर, वरंध या भागात रस्त्यावर ही फळं मुलं विकत असतात. ती दिसायला चिक्कूसारखी असतात. त्याची भन्नाट आंबट-गोड चव चाखायला हवीच. पौड, पिरंगुट, मुळशी किंवा भोर-वेल्हा, पानशेत या भागात आळू खायला मिळेल.

आंबा-फणसः आंबा आणि फणसाशिवाय रानमेव्याची यादी अपूर्णच. पक्व रायवळ आंबा बाजारात दाखल व्हायला काहीसा वेळ असला तरी घाडगा, खोबऱ्या, भोपळ्या या आंब्याचे पाड सध्या मंडईत दाखल झाले आहेत. कापा आणि बरका हे दोन्ही प्रकार मंडई आणि मार्केट यार्डमध्ये तुमची वाट पाहात आहेत.

आंबोळ्याः आंबोळ्या दिसताक्षणी तोंडला पाणी सुटतं, लांबट आकाराचं एखाद्या बीसारखं हे फळ या दिवसांत मिळतं. मावळात अजूनही विपुल प्रमाणात आंबोळ्यांची झाडं आहेत.

रानजांभूळः गावरान जांभूळ... चवीला हटकून गोड असणारी ही रानजांभळं आकारानं छोटी असतात. या जांभळात फारसा गर नसतो; पण ती औषधी असल्यानं खाल्ली जातात. त्यासह तुतीचे ढीगही गाड्यांवर सध्या विकायला आहेत. रसदार असं हे फळं खाताक्षणी जिभेवर जणू विरघळून जातं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रानमेवा आला होऽऽऽ

$
0
0



मुंबई टाइम्स टीम

जिभेवर हमखास चव रेंगाळेल, असा रानमेवा बाजारात दाखल होऊ लागला आहे. आंबट, गोड, तुरट अशा चवीच्या या रानमेव्यानं जणू अवघं रानच पक्व झालं आहे.

'डोंगरची काळी मैना.. आली हो'...अशी आरोळी घुमली, की घराघरांतून करवंद घेण्यासाठी लगबग उडायची. काळ्या मैनेचं हे कौतुक सध्या फक्त वाट्यावाट्यांनी मंडईत विकायला बसलेलं दिसतं. करवंदांसह बोरं, चन्यामन्या, रानजांभळं, आळू, आंबोळ्या, तोरणं, आमगुळे, रायआवळा अशा अस्सल मेव्यानं रान घमघमतं आहे. शहरी भागातून थोडं बाहेर पडलात, की या रानमेव्याची मजा मनसोक्त लुटता येईल.

आंबा, फणस आणि करवंद या पलीकडचा रानमेवा हल्ली फारसा माहिती नसतो आणि खाल्लाही जात नाही. रानमेव्यातल्या प्रत्येक फळाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. हा रानमेवा गुणकारी तर आहेच; पण त्याची चव रसना तृप्त करणारीही आहे. आंबे, करवंद, फणस हे शहरात मिळतातच; पण आळू, रानजांभळं, आंबोळ्या, तोरणं यांचा आस्वाद घेण्यासाठी थोडंसं बाहेरही पडायला हवं. साधारण अक्षय तृतीयेनंतर ही फळं पक्व होऊन खाण्यासाठी उपलब्ध होतात. लाँग ड्राइव्हचा बेत आखला, तर मुंबईजवळ पुण्याजवळच्या सगळ्या घाटमार्गांवर सध्या रानमेव्याचा तुम्हाला मनसोक्त आस्वाद घेता येईल.

आळूः आळूच्या झाडाची पानं ही पेरूच्या झाडासारखी असतात. त्यावर आळूची गोल-गोल फळं लागतात. पानशेत, वेल्हा, मुळशी, ताम्हिणी, भोर, वरंध या भागात रस्त्यावर ही फळं मुलं विकत असतात. ती दिसायला चिक्कूसारखी असतात. त्याची भन्नाट आंबट-गोड चव चाखायला हवीच. पुण्यजवळ पौड, पिरंगुट, मुळशी किंवा भोर-वेल्हा, पानशेत या भागात आळू खायला मिळेल.

आंबा-फणसः आंबा आणि फणसाशिवाय रानमेव्याची यादी अपूर्णच. पक्व रायवळ आंबा बाजारात दाखल व्हायला काहीसा वेळ असला तरी घाडगा, खोबऱ्या, भोपळ्या या आंब्याचे पाड सध्या बाजारात दाखल झाले आहेत. कापा आणि बरका हे दोन्ही प्रकार मार्केटमध्ये तुमची वाट पाहात आहेत.

काळी मैनाः डोंगरची काळी मैना हे करवंदाचं समर्पक नामकरण. कच्ची आणि पिकलेली करवंदं सध्या बाजारात दाखल झाली आहेत. लोहयुक्त करवंदं खाणं आणि त्याच्या चिकानं हात-तोंड माखून घेणं हा सगळ्यांच्याच आवडीचा उद्योग. कच्च्या करवंदाचं लोणचं भन्नाट होतं. पिकलेली करवंदं ही करवंदाच्या जाळीत जाऊन खाण्यातली मजा काही औरच.

आंबोळ्याः आंबोळ्या दिसताक्षणी तोंडला पाणी सुटतं, लांबट आकाराचं एखाद्या बीसारखं हे फळ या दिवसांत मिळतं. मावळात अजूनही विपुल प्रमाणात आंबोळ्यांची झाडं आहेत.

रानजांभूळः गावरान जांभूळ... चवीला हटकून गोड असणारी ही रानजांभळं आकारानं छोटी असतात. या जांभळात फारसा गर नसतो; पण ती औषधी असल्यानं खाल्ली जातात. त्यासह तुतीचे ढीगही गाड्यांवर सध्या विकायला आहेत. रसदार असं हे फळं खाताक्षणी जिभेवर जणू विरघळून जातं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भेळेचा खवय्या

$
0
0

अभिजित खांडकेकर अभिनेता

कदाचित फॉर्मल वाटेल; पण मला आज आईला जाहीरपणे धन्यवाद द्यावेसे वाटतात. पानात पडेल ते चवीनं आणि मुख्य म्हणजे कुरबुर न करता खाण्याबद्दल एकदम 'श्यामच्या आई'मधला मी शाम आहे. गमतीचा भाग सोडा; पण त्यामुळे जिभेला वळण लागलंय खवय्येगिरीचं. शिक्षण आणि नोकरीनिमित्त पुण्याला होतो मी आणि म्हणूनच स्वतःला भाग्यवान समजतो; कारण माझा खवय्येगिरीचा पिंड इथं पोसला गेला.

'आंध्रा मेस'मधला गनपावडर (लाल मिरची, डाळी घालून केलेली चटणी) आणि भात आजही स्मरणात आहे. कॅम्पातल्या 'बागबान'मध्ये तर मटणाचे विविध अप्रतिम प्रकार मिळतात. माझा वीक पॉइंट आहे, भेळ. कल्याणी आणि गणेश भेळ तर लव्ह अॅट फर्स्ट साइटच. जर ते मला ब्रँड अॅम्बेसिडर बनवणार असतील, तर मी एका पायावर तयार आहे.

नाशिक ही तीन अक्षरं उच्चारली, की याद येते ती मिसळीची. पावलोपावली इथं अल्टिमेट मिसळ मिळते. तर्रीदार मिसळ, सोबत शुभ्र थंडगार दही, पापड, चिरलेला कांदा आणि पाव. शेवटी मलईदार लस्सी. आणखी काय हवं?

हॉटेलात गेलो, की मी नेहमीचे पदार्थ न खाता मस्तपैकी नॉनव्हेजवर ताव मारतो. आमच्या घरी नॉनव्हेजला नो एंट्री आहे. ग्रुपनं आम्ही हॉटेलिंगला गेलो, की ऑर्डर मीच करतो. ऑर्डर करण्याची अद्भुत कला आहे माझ्यात. एक दाणा अन्न वाया नाही जायचं. मॉकटेल्स, सरबत, ज्यूसवरही माझं विशेष प्रेम आहे. कारली, भेंडी या ग्लॅमरलेस भाज्या आई मस्त करते. सुखदाच्या हातचं वरणफळं विशेष खाण्याजोगं आहे. एकंदरितच, खाण्यावरची प्रीत 'माझिया जिभे'ला चांगलीच कळली आहे!

सुरमई फ्राय

साहित्य ः सुरमई (तुकडे), चिमूटभर ओवा, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, एका लिंबाचा रसा, एक चमचा आलं-लसूण पेस्ट, एक चमचा मालवणी मसाला, मीठ चवीप्रमाणे, तेल, तांदळाचं पीठ.

कृती ः पहिल्यांदा मासे स्वच्छ धुवून त्यांना ओवा, मीठ, हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट , मालवणी मसाला, लिंबाचा रस चोळून ठेवावा. मॅरिनेट केल्यानंतर तासाभरानं तांदळाच्या पीठात घोळवून ठेवावं. तापलेल्या तेलात मंद आचेवर ते तुकडे खरपूस तळावेत.

शब्दांकन ः निनाद पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कैरीचा कायरस

$
0
0

मोहिनी दंडगे, नेरूळ

हा एक पारंपरिक पदार्थ आहे. कैरीप्रमाणे रायआवळे, चिंच, कवठ यापासूनही हा कायरस करता येतो.

साहित्य - एक मध्यम आकाराची कैरी, पाव वाटी चिरलेला गूळ (कैरीच्या आंबटपणानुसार कमी-जास्त घ्यावा), भाजलेल्या तिळाचे कूट एक चमचा, भाजलेल्या दाण्याचे कूट २ चमचे, ४-५ लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, सुक्या खोब‍ऱ्याचा किस १ चमचा, ७-८ मेथी दाणे, हिंग, जिरे, हळद फोडणीसाठी, एक चमचा तेल, धने-जिरे पावडर किंवा गोडा मसाला एक चमचा, पाणी, मीठ.

कृती - प्रथम कैरीची सालं काढून पातळ चपट्या अशा साधारण एक-दीड इंचाच्या रूंद फोडी करून घ्याव्यात. नंतर पातेल्यात तेल घालून, मेथी ,हिंग ,मोहरी जि‍‍ऱ्याची फोडणी करून घ्यावी. त्यात हळद मिरची व कढीपत्ता टाकून परतून घ्यावं. त्यात कैरीच्या फोडी घालून पुन्हा परतावं आणि पाणी घालून थोडी वाफ आणावी. झाकण ठेऊन फोडी थोड्या मऊ होण्याची वाट पाहा. त्यानंतर त्यात मीठ, गूळ, मसाला घालून थोडं पाणी घालावं. उकळी आली की दाण्याचं कूट, तिळाचे कूट, खोबरं हे तिन्ही घालावं. गरज वाटली तर आणखी पाणी घालावं. भातासोबत खायचं असेल तर जास्त पातळ करा. पोळीसोबत खायचं असेल तर थोडं घट्ट ठेवा.

टीप - कैरी कोवळी असेल, फार आंबट नसेल तर गूळ कमी लागतो.



कैरीची लाल चटणी

साहित्य - एक मध्यम आकाराची कैरी, ‌कैरीएवढाच कांदा, दोन चमचे दाण्याचं कूट, लिंबाएवढा गूळ, तिखट, मीठ चवीनुसार, फोडणीसाठी तेल हिंग, मोहरी, हळद

कृती - आधी कैरीचं साल काढून कैरी किसून घ्या. कांदा सोलून मोठा मोठा चिरून घ्या. यानंतर कांदा, कैरी, गूळ, तिखट, मीठ, दाण्याचं कूट असं सगळं एकत्र करून मिक्सरला वाटून घ्या. हा गोळा एका वाटीत काढा. ही चटणी थोडी थंड होऊ द्या. यानंतर या थंड चटणीवर झक्कास फोडणी घाला. ही चटणी पोळी, पराठा, थालीपिठ, पाव, भाकरी कशासोबतही खाता येते. भाताबरोबरही जेवताना खाल्ल्यास छान लागते. डब्यात द्यायलाही सोईची आहे. प्रवासातही टिकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिठलं भाकरी आणि वाइन!

$
0
0

करुणा पुरी

भरलेलं वागं किंवा भरीत-भाकरी, दालबट्टी, पिठलं भाकरीसोबत वाइन हे कॉम्बिनेशन कसं वाटतं? आश्चर्य वाटलं ना; पण पुण्यातील अनेक रेस्तराँमध्ये खान्देशी पदार्थांसोबत व्हाइट, रेड वाइन सर्व्ह केली जात असून, त्याला खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

साधारणपणे वाइन ही इटालियन, फ्रेंच किंवा काँटिनेंटल पदार्थांसोबत प्यायली जाते. त्यामुळे दोघांचीही चव वाढते. आपल्याकडे सुरुवातीला प्रयोग म्हणून मराठी पदार्थांसोबत वाइन सर्व्ह केल्यानंतर बऱ्याच रेस्तराँमध्ये खवय्यांनी त्याला पसंती दिल्याचं चित्र आहे. सामान्य लोकांना वाइनच्या चवीची ओळख होण्यासाठी आणि आपले मराठी पदार्थ उच्चवर्गीय आणि परदेशी खवय्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी असा प्रयोग केल्याचं रेस्तराँ मालक सांगतात.

कोणत्या पदार्थासोबत कोणती वाइन टेस्ट करायची याचे काही ठोकताळे आहेत, तरच दोन्ही पदार्थांची चव एकत्रित वाढते आणि ती गोष्ट चविष्ट बनते. 'या कॉम्बिनेशनचे कोणतेही लिखित नियम नाहीत, तर वाइन आणि मराठी पदार्थांची चव पाहून ते कॉम्बिनेशन सर्व्ह केलं जातं. तिखट पदार्थांसोबत चिल्ड व्हाइट वाइन सर्व्ह करतात आणि कमी तिखट किंवा फक्त वाफावलेल्या जसं, की माशांचा कोणताही प्रकार त्यासोबत रेड वाइन चविष्ट लागते,' असं '९६के'चे राहुल म्हस्के सांगतात.

'वाह मराठी'मध्ये केवळ मेन कोर्सच नाही, स्टार्टर आणि डेझर्टसोबतही वाइन सर्व्ह केली जाते. 'प्रयोग म्हणून आम्ही मराठी पदार्थांसोबत वाइन सर्व्ह करायला सुरुवात केली. केवळ मेन कोर्स नाही, तर स्टाटर्स-डेझर्टबरोबरही वाइनची लज्जत वाढते. महाराष्ट्रात वायनरीज वाढत असल्यानं आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. पुण्यातील प्रसिद्ध वाइन कन्सल्टंटकडून टेस्टिंग सेशन घेतल्यानंतर आम्ही 'वाह मराठी'मध्ये 'वाइन विथ मराठी फूड' द्यायला सुरुवात केली,' असं 'वाह मराठी'चे आशिष मोडक यांनी सांगितलं.

मराठी पदार्थांना ग्लॅमर देण्यासाठी...

खान्देशी पदार्थांना ग्लॅमर देण्याच्या हेतूनं त्याच्यासोबत वाइन सर्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. यामुळे ना मराठी पदार्थाची चव वाढते, ना वाइनची. खरं तर ते एक फॅड आहे. दक्षिण भारतात इडली-सांबारसोबत मध्येमध्ये फिल्टर कॉफीचा घोट घेण्याची पद्धत आहे. तसंच वाइन आणि मराठी पदार्थांचं आहे. मात्र, सर्व्ह केल्या जाणाऱ्या पदार्थाशी वाइनची चव मिळतीजुळती असली पाहिजे, नाहीतर खाण्याचा विचका होऊ शकतो. - विष्णू मनोहर, प्रसिद्ध शेफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आलू पराठे द बेस्ट!

$
0
0

पौर्णिमा तळवलकर, अभिनेत्री

'अगं शिकून घे स्वयंपाक, उद्या सासरी गेलीस, की कसं बरं होईल तुझं? एकदम सगळं काम पडलं अंगावर तर?' हे आणि असे प्रश्न माझ्या आईनं मला कधी म्हणजे कधीच नाही विचारले, टि‌पीकल आई कॅटगिरीतली माझी आई नाही.

मला कंटाळा आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे चहा बनवणं. एखाद्याला चुटकी सरशी वाटणारी ही गोष्ट मला विचारानंही दमवते. तेव्हा आई गमतीनं म्हणायची, की तुला चहाबाज सासर मिळायला हवं आणि तेही एकत्र कुटुंबातलं. सुदैवानं मला एकत्र कुटुंबातलं सासर मिळालं; पण सारे कॉफीचे भक्त. आजसुद्धा माहेरी गेले, की आईच्या हातचे पदार्थ आवर्जून खाते. तीही मोठ्या प्रेमानं मला खाऊ घालते. ताकातला पालक, कांदा-बटाट्याची परतलेली भाजी, रव्याचे लाडू, खमंग चिवडा असे एकाहून एक सरस पदार्थ. तोंडात ठेवता विरघळणारे दहिवडे केवळ माझीच आई बनवू शकते, असं मला वाटतं. आईनं शिकवलेला आलू पराठा मी तंतोतंत शिकलेय. माझा नवरा रोहित माझ्या हातच्या चिकनच्या नानाविध प्रकारांवर फिदा आहे. अळूचं फदफदसुद्धा परफेक्ट जमतं मला.

बोंबील ही तीन अक्षरं नुसती ऐकली, तरी डोळ्यांसमोर येतं ते पुण्याचं 'समुद्र'. जशी दारूबाजांना दारू चढते तसं इथं जेवण चढतं. मी अनुभव घेतलाय बरेचदा. 'तिरंगा'मधले तंगडी कबाब, प्रॉन्स फ्राय तर 'वरचा क्लास'. पुण्याला गेले आणि 'फिशकरी राइस'मध्ये भेट दिली नाही असं कधीच झालं नाही. सारे पदार्थ एकदम निगुतीने बनवलेलं असतात. चाइनीज खाण्याचा मूड झाला, की 'फाइव्ह स्पाइस'शिवाय दुसरा पर्याय नाही. तिथल्या नुडल्स आणि रेड थाई करी माझा क्रश आहेत.

आलू पराठे

साहित्य : सहा उकडलेले बटाटे, चमचाभर धणे जिरेपूड, चमचाभर आलं-मिरची पेस्ट, चमचाभर आमचूर पावडर, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा पिठीसाखर, कणीक, साजूक तूप.

कृती : उकडलेले बटाटे हलक्या हातानं कुस्करावेत. त्यात कणीक आणि साजूक तूप वगळता बाकीचं सारं साहित्य घालावं. कणीक किंचितशी सैलसर भिजवून त्याचे गोळे करावेत. त्यात वरील सारण अलगद भरून पराठा लाटावा. नॉनस्टिक पॅनवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर खरपूस भाजावा. भाजताना बाजूनं साजूक तूप सोडावं. वाटीभर दाण्याच्या कुटामध्ये किंचित हिंग, मीठ, हळद तिखट, मीठ आणि चमचाभर गोड दही मिसळून त्यासोबत गरमागरम आलू पराठे सर्व्ह करावेत.

शब्दांकन : निनाद पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रातांब्याच्या बियांचं स्वादिष्ट पन्हं

$
0
0

अंजली कानिटकर, चेंबूर

साहित्य : अर्धा किलो रातांबे, साधारण १ वाटी बारीक चिरलेला पिवळा गूळ, जिरे पावडर, मीठ, थोडी साखर, लाल तिखट

कृती : रातांब्याच्या फळांतील बिया काढून घ्या. बियांना गर चिकटलेला असतो. थोडा चिकटही असतो. त्यावर थोडं मीठ घालून हाताने बिया चांगल्या कुस्करून त्यातील गर काढून घ्या. नंतर त्यात पाणी घालून, बिया गाळण्यातून गाळून घ्या. गाळण्यावर परत बिया राहतील. त्यात पाणी घालून परत कुस्करा. असं एक ते दोन वेळा करा. याचं साधारण ६ ग्लास पन्ह तयार होईल. आता त्यात १ चमचा जिरे पावडर, चवीपुरते मीठ तिखट घाला. बारीक चिरलेला गूळ घालून तो विरघळेपर्यंत ढवळा. त्यात साधारण १ टेबल स्पून साखर घाला. आता रातांब्याच्या सालांचे तुकडे करून बरणीत साखर घालून झाकण लावून ठेवा.

उकडआंबे

साहित्य : ६ साधारण लहान अर्धवट पिकलेले आंबे, १ वाटी लालमोहरीची पावडर, २ चमचे मेथी पावडर, २ चमचे हिंग, हळद, अर्धी वाटी मीठ, तेल १ वाटी

कृती : चाळणीवर पाणी न घालता आंबे वाफवून घ्या व ते गार करा. नंतर मोहरी, २ वाटी पाणी व एक लहानसा तुकडा गूळ घालून ते मिक्सरमधून वाटून घ्या. वाटताना मोहोरी छान फेसली पाहिजे. ते मिश्रण साधारण पांढरं दिसेल आणि अगदी नाकात जाण्यासारखा त्याचा वास असतो. आता त्यात पाववाटी तिखट घाला.

१ वाटी तेल गरम करा. ते छान तापल्यावर गॅस बंद करा. चिमूटभर हळद घालून बघा. ती पिवळी राहिली पाहिजे. आता त्यात हिंग, मेथी पावडर, हळद घाला व फोडणी गार करा. गार झाल्यावर फोडणी फेसलेल्या मोहरीवर घाला. मोहरीचं मिश्रण थोडं पातळसर असावं. आता त्यात थोडं तिखट घाला. एक आंबा घ्या. फोडणी घातलेल्या मिश्रणात बुडवा. स्वच्छ काचेच्या बरणीत ठेवा. असे सर्व आंबे मिश्रणात बुडवून ठेवा. उरलेलं मिश्रण आंब्यांवर ओता. बरणीला झाकण लावून वर कपडा बांधा. बरणी कपाटात ठेवून द्या. साधारण श्रावणात हे उकडआंबे तयार होतात. खूप चविष्ट लागतात. एक आंबा बाहेर काढला की ५ ते ६ जणांना पुरतो.

फणसाचे उकड गरे

साहित्य : गऱ्याचा फणस, तूप, जिरे, खोबर, दाण्याचे कूट, लालसुकी मिरची, तिखट, मीठ, साखर

कृती : गऱ्यांमधून आठळी काढून गऱ्याचे हाताने उभे-उभे तुकडे करावे. आठळी ठेचून त्याचं साल काढून टाकावे. आ‌ठी‍ळा व गरे उकडून घ्या. नंतर दोन्ही एकत्र करून त्यात साधारण अर्धी वाटी पाणी घाला. नंतर चवीनुसार मीठ, साखर, खोवलेलं खोबर चवीपुरती साखर घालावी. १ चमचा लाल तिखट घालून चांगली वाफ आणावी. सर्व एकजीव झाल्यावर गॅस बंद करावा.

फोडणीसाठी २ टेबल स्पून तूप गरम करून घ्या. त्यात ७ ते ८ लाल मिरच्या तळून बाहेर काढा. नंतर त्यात जिरं घालून ते गुलाबी झाल्यावर गॅस बंद करा. तूप जिऱ्याची फोडणी गऱ्यांच्या भाजीवर घाला. तळलेल्या मिरच्या हाताने चुरून जेवढं तिखट हवं असेल तेवढ्या मिरच्या भाजीवर घाला. वर अर्धी वाटी दाण्याचं कूट घालून थोडी कोथिंबीर व नारळ घालून सर्व्ह करा. ही उपासाची भाजी नुसती खायलाही खूप छान लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 1266 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>