Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 1266 articles
Browse latest View live

ईदची मेजवानी

$
0
0

सौरव बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

रमजान पर्वात मुस्लिम बांधवांचे काही खास पदार्थ तयार होत असतात. ते पदार्थ फक्त रमजान पर्वातच उपलब्ध होतात. रमजान महिन्यात इफ्तार पार्टीसाठी या पदार्थांची मेजवानी असते. त्यामुळे मिठाई, सुकामेवा तसेच खमंग पदार्थांची अनेक दुकाने भद्रकाली परिसरात थाटली आहेत. शिरखुर्मा, सुतरफेणी, मालपोवा, शाही तुकडा, तुर्री आणि कबाब या पदार्थांना जास्त मागणी आहे. जवळपास या सर्वच पदार्थांमध्ये शेवया वापरल्या जातात. परंतु त्यांच्या चवीमध्ये मात्र फरक आहे.

स्पेशल मालपोवा

स्पेशल मलई मालपोवा हा पदार्थ जास्त आवडीने खाल्ला जातो. यामध्ये मैदा घेऊन त्यात साखर घालत तुपामध्ये एकत्रित केले जाते. गोडी अधिक वाढावी म्हणून मलई बर्फीदेखील यामध्ये टाकली जाते. त्यानंतर या सर्व मिश्रणात उकळलेली अंडी घालून स्पेशल मालपोवा तयार केला जातो. अंड्याच्या ऑम्लेटप्रमाणे हा मालपोवा असतो. अंड्याच्या स्वादासोबतच मलई बर्फी असल्याने मलईयुक्त अंड्याची चव याला प्राप्त होते. दूध बाजारातील 'इक्बाल हॉटेल'मधील मालपोव्याला जास्त मागणी आहे.

सुतरफेणी

सुतरफेणी तयार करताना तांदळाचा तयार भात घेऊन त्यात गोड दूध घातले जाते. तयार दूधात व्हॅनीला किंवा मँगो क्रश घातला जातो. नंतर यामध्ये खारिक, पिस्ता बदाम यांचे तुकडे घालून सुतरफेणी सर्व्ह केली जाते. दूध बाजारातील 'मुंबई स्वीट्स' येथील सुतरफेणी नाशकात फेमस आहे.

शाही तुकडा

हा खास पदार्थ रमजानमध्येच तयार होतो. मूळचा इराणचा असलेला हा पदार्थ बनवताना विशिष्ठ प्रकारचा ब्रेड यासाठी वापरला जातो. हा ब्रेड मैदा किंवा गव्हाचा असतो. शाही तुकडा तयार करताना शेवाया दुधात भिजवून त्याचा लगदा तयार केला जाते आणि त्यानंतर या शेवाया त्या ब्रेडवर ठेवून त्यावरती मलई (काही ठिकाणी बासुंदी) तसेच बदाम, पिस्त्याचा क्रश भुरभुरून हा शाही तुकडा सर्व्ह केला जातो. भद्रकाली परिसरातील सर्वच मिठाईच्या दुकानात या शाही तुकड्याला मागणी आहे.

तुर्री

तुर्री हा पदार्थ नाही तर एक खास असा मसाला आहे. खारिक, बदाम, खजूर, पिस्ता सर्वच सुकामेवा वापरत त्यांची पूड तयार केली जाते. हा तयार मसाला गरम दुधात साखर मिसळून घालता जातो. त्यावर पुन्हा सुकामेवा घालून दूध सर्व्ह होते. खास मसाला दुधासाठी तयार होण्याऱ्या या मसाल्याला 'तुर्री' म्हटले जाते. रमजान पर्वात थाटलेल्या सर्वच सुकामेव्याच्या दुकानात हा मसाला उपलब्ध आहे.

शिरखुर्मा

रमजान ईदला शिरखुर्म्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिरखुर्मा बनताना दूध उकळून त्यात साखर घातली जाते. दुधात नंतर उकळलेल्या शेवाया व भात घालून त्यावर तूप तसेच चवीसाठी खजूर, बदाम पिस्ता याची पुडही घालती जाते. काहीवेळा खाण्याचा रंगही वापरला जातो.

कबाब

रमजान पर्वात सर्वच गोड पदार्थांना महत्त्व असले तरी चिकन कबाबही तेवढेच आवडीने खाल्ले जातात. बोनलेस चिकनमध्ये बटाट्याचा क्रश घातला जातो. यात तिखट, मिरची, खास कोकणी मसाले घालून या तयार मिश्रणाचे त्रिकोणी, गोल अशा विविध आकारांचे

कबाब तयार केले जातात. ते कबाब तळून घेतले जातात. काही ठिकाणी कबाब बारिक शेव किंवा खसखस लावून ते परतले जातात. खमंग, कुरकुरीत तिखट अशा कबाबना जोरदार मागणी असते. नाशकातील 'गरिब नवाज' चे कबाब फेमस आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाव फॅन्सी; पण...

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम



मध्यंतरी एक फॉरवर्ड मेसेज खूप लोकप्रिय झाला होता, ज्यात एका शेफची बायको त्याला फोन करून रात्री जेवण्यासाठी केलेल्या पदार्थांचं अगदी साग्रसंगीत, अलंकारिक भाषेत लांबलचक वर्णन करते... सगळं वर्णन ऐकून खूष झालेला शेफ नवरा बायकोला त्या रूचकर पदार्थाचं नाव विचारतो, तेव्हा ती थंडपणे उत्तरते - वरण-भात!

या विनोदाची आठवण होण्याचं कारण म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यानंतर पानंच्या पानं असलेला भारंभार मेन्यू आणि त्यात वर्णन केलेले खाद्यपदार्थ वाचताना तोंडाला पाणी सुटतं. हौसेनं आपण ते पदार्थ मागवतो आणि लक्षात येतं, की अरेच्या, हे तर आपण घरी खातो ते अमुकतमुक... किंवा यात एवढं खास ते काय असा विचार हमखास मनात येतो. हॉटेल मेन्यूमधल्या अशाच काही पदार्थांच्या गमतीशीर नावांबद्दल...

फिंगर फूड

हॉटेलमध्ये गेल्यावर कितीही वेळ झाला, तरी काय मागवायचं याची चर्चा संपत नसते. तरीही आपण वेटर किंवा कॅप्टनला ऑर्डर देण्यासाठी बोलावतो आणि तो अदबीनं काही 'फिंगर फूड' का नाही घेत असं सुचवतो. नावावरून काहीतरी डोक्यात क्लिक होतं; पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करत कॅप्टनच्या सांगेल ते 'फिंगर फूड' मागवतो. नेहमीचीच डिश टेबलावर आली, की आपल्याला कळतं, की समोरच्या ताटलीतलं अन्न हातानं खाण्यासारखं आहे, म्हणून ते फिंगर फूड! पाश्चात्य देशांत आपल्यासारखी हातानं जेवायची पद्धत नाही. त्यांच्यासाठी काटेचमचे न वापरता हातानं खायचे पदार्थ म्हणजे फिंगर फूड. आपण गेली कित्येक शतकं हातानं खात आहोत; पण हुशार हॉटेलवाले आपल्याला 'फिंगर फूड' सर्व्ह करायला लागले आहेत खरं.

स्टीम राइस

मेन्यूकार्डावर राइस म्हणजेच भाताच्या खाली जे विविध प्रकार लिहिलेले असतात, ते त्यात पहिलंच नाव असतं, स्टीम राइस. आता हॉटेलमध्ये भात हा स्टीम्ड म्हणजेच वाफाळताच सर्व्ह केला गेला पाहिजे असा विचार आपल्या मनात येतो. नाहीतर चिल्ड राइस असाही प्रकार लिहायला पाहिजे. शिवाय, भात स्टीम केल्याशिवाय तो तयार होणार कसा? त्यामुळे या स्टीम राइसचं लॉजिक हॉटेलवाल्यांनाच माहीत.

शाही

शाही म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर जे येतं आणि प्रत्यक्षात टेबलावर जे येतं त्यात भरपूर तफावत असू शकते. शाही म्हटलं, की बऱ्याचदा सुक्यामेव्याचे तुकडे याच्या पलीकडे काही येत नाही. शाही बिर्याणीत कित्येकदा फक्त तळलेले चार काजू 'शाही' नावाखाली घातलेले असतात. सगळ्यांत कहर म्हणजे शाही तुकडा... ज्यात बासुंदीमध्ये बुडवलेला ब्रेड आपल्याला खायला दिला जातो.

फ्रिटर्स

अनियन फ्रिटर्सची ऑर्डर दिल्यानंतर पुढ्यात जे येतं ते पाहिल्यावर खाणाऱ्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या भावनांना भ्रमनिरास असं म्हणायला हरकत नसावी. चीज फ्रिटर्स, बनाना किंवा पोटॅटो फ्रिटर्स म्हणजे आपली भजी! विकीपीडियाच्या व्याख्यानुसार, फ्रिटर्स म्हणजे तळलेल्या पदार्थाचा भाग किंवा ब्रेड घालून केलेला तळलेला पदार्थ. म्हणजे आपली भजीच ना. मग, सरळ-सरळ कांदा भजी किंवा फार फार तर अनियन पकोडे (काही ठिकाणी तो पकोरा असतो) लिहायला काय हरकत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीरखुर्मा

$
0
0

रमझाननिमित्ताने या खास पाककृती शेअर केल्या आहेत, मटाच्या वाचक नाझिमा खान यांनी.

सीरखुर्मा

साहित्य : काजू, बदाम, बारीक चिरलेला पिस्ता, चारोळी ,चार लवंगा, दोन तुकडे दालचिनी, चार लहान वेलच्या, साजूक तुपात परतलेल्या शेवया, दूध, साखर, केशर.

कृती : सर्वप्रथम गॅसवर पातेलं ठेऊन त्यात साजूक तूप घाला. मग त्यात बारीक चिरलेला काजू, बदाम, पिस्ता, चारोळी, लवंग, दालचिनी, वेलची घालून मंद गॅसवर परता. परतून झाल्यावर त्यामध्ये एक लीटर दूध घाला आणि चार कप साखर घालून पंधरा मिनिट छानपैकी शिजवा. त्यानंतर दूध व्यवस्थित उकळल्यानंतर परतलेल्या शेवया पाच मिनिट शिजवा. शेवटी थोडं वेगळं दूध घेऊन त्यात केशर घाला. आता हे मिश्रण शिजलेल्या सीरखुर्मामध्ये घाला. मग सर्व एका भांड्यात काढून वाढा. ‌सीरखुर्मा म्हणजे रमझानची खासियत आहे. शिवाय तो चविष्ट आणि पौष्टीक असल्याने नक्की ट्राय करून पाहा.

चपली कबाब

साहित्य : अर्धा किलो चिकन किंवा मटन खिमा, अर्धा कप पुदिना, अर्धा कप शेपू, एक कप कोथिंबीर, दोन चमचे आलं लसूण, अर्धा कप तळलेला कांदा, एक छोटा चमचा बडीशेप, एक चमचा जिरे, दोन हिरव्या मिरच्या, एक चमचा गरम मसाला, एक अंड, अर्धा कप बारीक शेव.

कृती : खिमा, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर, शेपू, बडीशेप, मीठ, आलं लसूण हे सगळं एकत्र करून त्याचं मिश्रण घोटून घ्या. ते मिश्रण एका भांड्यात काढून ठेवा. आता यात तळलेला कांदा आणि डाळिंब घालून चांगल्याप्रकारे एकत्र करा. अंड फोडून दुस‍ऱ्या भांड्यात ठेवा. बारीक शेवसुद्धा दुसऱ्या भांड्यात ठेवा. कढईत तेल गरम करायला ठेवा. एकत्र केलेलं मिश्रण समोर ठेवा व त्यातून थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन गोळ्यासारखे आकार देऊन ते चपटे करा. त्यानंतर अंड्यामध्ये बुडवा. मग शेवेतही घोळवा आणि तळून घ्या. हे चपली कबाब हिरव्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठमोळे किचन

$
0
0

भारतीय खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे ती पदार्थ आणि चवींतील वैविध्यामुळेच. प्रत्येक प्रांताची खाद्य संस्कृती वेगळी आहे. मराठी संस्कृतीमध्ये ताट कसे वाढायचे याचीदेखील एक पद्धत आहे. ती योग्यच आहे. नाकासमोर मीठ आणि डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर असे पदार्थ, उजव्या बाजूला भाजी, मध्ये भाताची मूद आणि पोळी... असे रचनात्मक आणि आकर्षकरित्या वाढलेले ताट समोर आले की भूक लागली नाही तरच नवल...

मराठमोळी खाद्य संस्कृती म्हटली की डोंबिवलीतील पंडित किचन्सला पर्याय नाही. उडपी, जैन, चायनीज पदार्थांप्रमाणेच मराठमोळ्या थाळीमध्येही वैविध्य आहे, हे इथे पाहून लक्षात येतं. मराठमोळ्या पदार्थांची सर इतर कुठल्याच पदार्थांना येऊ शकत नाही. सकाळच्या वेळी पंडित किचन्समध्ये चक्कर टाकलीत तर इथे मिसळ आणि थालीपीठ नक्की खायला हवं. ते खास आहेतच, पण त्याचसोबत कॉर्न भजी, मटार पॅटीस असे पदार्थही फार रुचकर आहेत. येथील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे मिळणारी थाळी...

पाककलेचा उत्तम नमुना, त्याचबरोबर टापटीप आणि येणाऱ्या ग्राहकाचे आदराने केले जाणारे स्वागत, ही इथली खासियत. इथे गावरान थाळीची मजा चाखता येईल. गरमागरम भाकऱ्या त्याच्या जोडीला पिठलं, सोबत हिरव्या मिरचीचा झणझणीत ठेचा, वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत, पालेभाजी, मसाले भात आणि कुरकुरीत गरम कांदा भजी आणि वरून ग्लासभर ताक. पण गावरान थाळी शनिवार आणि रविवार यादिवशीच मिळते. इथे स्पेशल थाळी देखील आहे. ज्यामध्ये विविध भाज्या, पोळी, कोशिंबीर, पापड असे सुग्रास अन्न चाखता येते.

तिखट पदार्थांप्रमाणेच येथील पक्वान्नंदेखील अप्रतिम... त्यात उकडीचे मोदक अव्वल आहेत. संकष्टीला येथे २००हून अधिक उकडीचे मोदक संपतात. त्याचबरोबर मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यावर तुपाची धार... असा मस्त बेत असतो. बाहेरचे मसालेदार पदार्थ जिभेला चविष्ट वाटत असले तरी, पोटाला ते त्रासदायक ठरतात. पण पंडित किचन्समध्ये मिळणारी थाळी अगदी घरगुती असते. त्यामुळे असे हे सुग्रास जेवण जेवल्यास तन आणि मन दोन्ही तृप्त होतात. काय मग जमला का बेत?

डोंबिवलीतील औद्योगिक महामंडळाच्या निवासी विभागात पंडित किचन आहे. शहरी कटकटीपासून दूर, निवांत आणि शांत परिसरात जेवणाचा पुरेपूर आनंद घेता येईल, हे नक्की... 'अन्न हे पूर्ण ब्रह्म' हे या थाळीची चव चाखल्यावर पुरेपूर पटते.

(शब्दांकनः तन्मय टिल्लू)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खानदेशी ठसका

$
0
0

>> ऋतुजा जोशी

विविध वैशिष्ट्यांनी नटलेला, गिरणा, तापी, वाघूर या नद्यांनी समृद्ध असलेला महाराष्ट्राच्या उत्तरेचा भूप्रदेश म्हणजे खानदेश. ठसकेबाज शब्दसंपदेनं सजलेली अहिराणी भाषा, परिश्रमी जीवनशैली आणि तिला अनुरूप असलेली अस्सल गावरान व झणझणीत शेवभाजी, वांग्याचं भरीत, मिरचीचा लसूण घालून केलेला ठेचा, ज्वारीची आणि कळण्याची भाकरी ही खानदेशची खाद्यसंस्कृती. खानदेशी लोकांचं जेवढं तिखटावर प्रेम तेवढंच गोड पदार्थांवरही. गोड शेव, पुरणपोळी, रव्याची लापशी हे इथले खास पदार्थ. जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश खानदेशात होतो. शेती व शेतीपूरक उद्योगधंदे हा येथील लोकांचा पारंपरिक व प्रमुख व्यवसाय. केळी, ज्वारी आणि कपाशीचं उत्पादन इथे मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे तिन्ही ऋतू इथं तीव्र असतात. त्यामुळे या जीवनशैलीला आणि वातावरणाला पूरक अशी येथील खाद्यसंस्कृती आहे. खानदेशातील लोकांची कष्टाची जीवनशैली असल्याने सतत ऊर्जा मिळत राहावी, यासाठी जास्त तिखट पदार्थांचा समावेश जेवणात असतो.

'वांग्याचं भरीत आणि शेवभाजी म्हणजे खानदेश' असं समीकरणच बनून गेलंय. विशेषत: नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत जळगाव तालुक्यातील बामणोद, भालोद, ममुराबाद, असोदा, भादली या परिसरांतील माती व वातावरण भरताच्या या विशिष्ट वांग्यासाठी पूरक आहे. तूर व कपाशीच्या काड्यांवर खरपूस भाजलेली वांगी, कांद्याची पात, लसूण, लवंगी मिरच्यांचा हिरवा ठेचा आणि तेलाचा सुयोग्य वापर करून तयार केलेलं चटकदार भरीत म्हणजे अस्सल खानदेशी मेजवानी. त्यात भर पडते ती तळलेल्या व मीठ लावलेल्या हिरव्या मिरचीची. ताजी वांगी, शेतातूनच खुडलेल्या मिरच्या, कांद्याची पात, तोंडी लावायला कैरीचं लोणचं, कोशिंबीर आणि विहिरीचं पाणी हे सगळं शेतात बसून खाण्याची मज्जाच काही और असते.

शेवभाजीचा प्रकार आदरातिथ्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा समजला जातो. विशेषत: घाईच्या वेळी बनवण्यास सोपा आणि लज्जतदार असा हा पदार्थ आहे. भरीत व शेवभाजीसाठी लागणारे खास मसालेही स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असतात. खानदेशी हिरव्या लवंगी मिरचीचा ठेचा टाकून तयार केलेलं लज्जतदार, झणझणीत भरीत आणि नंदुरबारच्या मातीतून तयार झालेल्या लालबुंद मिरची पावडरपासून तयार केलेल्या गरमागरम शेवभाजीमुळे जिभेला आलेला तिखटपणा कमी करण्यासाठी देशी साजूक तुपात तयार केलेला रव्याचा दराबा आणि गुळापासून बनवलेली गोडीशेव हा रास्त उतारा. त्यामुळे घराबरोबरच ढाबे, लहान-मोठ्या हॉटेलमध्ये भरीत व शेवभाजीच्या खाद्यसंस्कृतीचे खास उत्सव साजरे केले जातात. शेवभाजी व भरताच्या या खानदेशी मेन्यूचा आस्वाद घेण्यासाठी मुंबईकर-पुणेकर जळगावच्या नातेवाइकांकडं हक्कानं येतात.

खानदेशात सर्वच सण उत्सवांसाठी आणि एरवी कोणीही पाहुणे आले तरी पुरणपोळी किंवा खापरावरची पोळी-खीर, आंब्याचा रस, हरभऱ्याच्या डाळीची रस्सी म्हणजे मसालेदार आमटी, भात, नागलीचे पापड, कुरडया, बिबड्या, कांद्याची भजी असा भरगच्च बेत असतो. मातीचे खापर चुलीवर ठेवतात आणि त्यावर सारण भरलेली पोळी भाजतात. रुमाली रोटीसारखी ही पोळी बायका हातावर मोठी करतात. ही पोळी करताना पहाणे हा एक सुंदर अनुभव असतो. येथील लोक दालबाटी हा प्रकारसुद्धा उत्साहाने खातात. शेतात चुलीवर बट्टी म्हणजेच बाटी भाजली जाते. ह्या बाटीवर वरण आणि साजुक तूप घालून खातात.

खानदेशी ठेचा, लोणची, मसालेदार पापड हे परदेशी पाठवले जाते. मिरचीचा लसूण घालून केलेला ठेचा, तिखट शेव हे इथले वैशिष्ट्य. शेवेची भाजी व भाकरी, त्यासोबत कांदा हा बेतही अनेक जणांकडे असतो. भाकरी किंवा पोळीवरही तेल, तिखट व मीठ घालून खाणेसुद्धा खानदेशी लोक एन्जॉय करतात.

शेव भाजी

साहित्य - भाजीची शेव, ४-५ कांदे, लसूण, किसलेले खोबरे, खसखस, शेव भाजीचा तयार मसाला, धणे-जिरे पूड, धणे, तिखट, मीठ, हळद, हिंग, तेल

कृती - कांद्याचे उभे काप करून ते तेलावर परतून घ्यावे. खोबऱ्याचा कीस, धणे, खसखस मंद आचेवर परतून घ्यावे. हे सगळे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. त्यानंतर थोडी भाजीची शेव मिक्सरमध्ये वाटून त्याची पूड करून घ्यावी. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, तिखट, धणे-जिरे पूड आणि शेव भाजी मसाला टाकून फोडणी करून घ्यावी. कांदा, खोबरे, खसखस आणि शेवेची पूड हे वाटण फोडणीत टाकून ते परतून घ्यावे. १५-२० मिनिट परतल्यानंतर त्यात पाणी टाकून उकळी काढून घ्यावी. चवीप्रमाणे मीठ टाकावे. नंतर त्यावर कोथिंबीर टाकावी. भाजी सर्व्ह करताना त्यात शेव घालून द्यावी.

वांग्याचे भरीत

साहित्य - चणा डाळ, साखर/गूळ, जायफळ, वेलदोडे पूड, कणिक, मीठ, तेल

कृती - चण्याची डाळ कुकरमध्ये चार ते पाच शिट्या करून शिजवून घ्यावी. डाळ गार झाल्यावर चाळणीमध्ये उपसून ठेवावी. त्यात साखर किंवा गूळ घालून ते शिजवून घ्यावे. शिजल्यानंतर पुरण यंत्रातून डाळ बारीक करून घ्यावी. त्यात जायफळ, वेलदोडे पूड घालून व्यवस्थित एकत्र करावे आणि गार होण्यास ठेवावे. कणकेत तेलाचे मोहन आणि किंचित मीठ घालून कणिक सैलसर भिजवावी. साधारण तासभर मुरल्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या पाऱ्या करून त्यात पुरण भरावे आणि पोळ्या लाटाव्या. शेकताना तव्यावर थोडे तूप सोडावे. ही पोळी तूप घालून खावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चहामय जग

$
0
0

>>दीपिका तांबे

'सुर्रर्र के पिओ' असं म्हणत चहाचा आनंद घेत आपल्या दिवसाची सुरुवात होते. भारतात जसा दूध आणि साखरेचा चहा, ब्रिटनमध्ये हाय टी, चीनमध्ये ग्रीन टी, जपानमध्ये माचा टी लोकप्रिय आहेत तसेच इतर काही देशांत चहाचे वेगवेगळे प्रकार लोकप्रिय आहेत. जगभरात पिला जाणारा चहा तितक्याच विविधतेने बनविला जातो. चहाचे विविध प्रकार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

(लेखिका चहा संशोधक आहेत)

अमेरिका: आईस टी

सन टी

रशिया : समोवर

तिबेट : लोणी आणि मीठाचा चहा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिकूया ‘डाएट ब्रेकफास्ट’ रेसिपी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

चवदार पदार्थांचा चव चाखताना फिगरचा आकारही वाढणार नाही शिवाय पोटही बिघडणार नाही, अशा रेसिपी म्हणजे सोने पे सुहागा... महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लबतर्फे हीच संधी मिळणार आहे. क्लब सदस्यांसाठी खास डाएट ब्रेकफास्ट वर्कशॉप आयोजित केले आहे. शनिवारी (ता. २५) राजारामपुरी ५ वी गल्ली येथील हॉटेल स्काई येथे सकाळी १० वाजता हे वर्कशॉप होणार आहे. यामध्ये फेन्यूग्रीक स्प्रूटस पराठा, इडिअप्पम वुईथ व्हेज स्टीव्ह, पुट्टु कडाला करी, अप्पम वुईथ स्टीव्ह आणि ओटस इडली अशा हटके रेसिपी शिकता येणार आहेत. दिवसभराच्या एनर्जीचा पहिला टप्पा असलेल्या ब्रेकफास्टच्या डीशला आरोग्यदायी बनवण्याच्या या कार्यशाळेत तुम्हीही सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

चवीरवीचे खाण्यातही एक वेगळीच मजा असते. रोजच्या एखाद्या पदार्थालाही नाविन्याची फोडणी दिली तर त्यादिवशीचा बेत अगदीच चवदार होऊन जातो. आजकाल खवय्येगिरीला फिटनेसची जोड दिली जातेय. त्यामुळे आवडणारा पदार्थ खाताना फिटनेसची काळजी वाटतेच. खायचे तर आहे पण फिगरही सांभाळायची आहे ही कसरत तर आ​णखी वेगळीच. त्यातूनच डाएटप्रेमींसाठी मेन्यूकार्ड तयार करायचे म्हणजे आहारतज्ज्ञांची कसोटी लागते. आरोग्यदायी ब्रेकफास्ट घरच्या घरी बनवण्याचे प्रात्यक्षिक यानिमित्ताने शिकता येणार आहे. शेफ अनिल मोरे, अनिल सिंग आणि इंचान मंडल यांच्याकडून या वेगळ्या रेसिपीज करून दाखवल्या जाणार आहेत. दिवसाच्या खवय्येगिरीची सुरूवात ब्रेकफास्टने होत असते. या ब्रेकफास्टला डाएटफूडची जोड दिल्यास आरोग्य निरोगी राखण्यास मदत होऊ शकते. याच हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नावनोंदणी आवश्यक

डाएट ब्रेकफास्ट कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी मटा कल्चर क्लबच्या सदस्यांना २०० रूपये प्रवेश शुल्क आहे तर अन्य वाचकांसाठी ४०० रूपये प्रवेश शुल्क आहे. सहभागी होण्यासाठी शुक्रवार (ता.२४) सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत ०२३१-६६२२३१७ किंवा ९४२३८१४६९९ या क्रमांकावर नाव नोंदणी करावी.

'मटा कल्चर क्लब'

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वाचकांना थेट सहभागी करून घेणारा उपक्रम

क्लबच्या सदस्यांना कार्यक्रमाच्या प्रवेश शुल्कात खास सूट

सदस्यांना अग्रक्रमाने प्रवेश आणि सेलिब्रिटींना भेटण्याची संधी

BCCL या नावे काढलेला २९९ रुपयांचा चेक व ओळखपत्राच्या झेरॉक्स कॉपीसह फॉर्म भरा

अधिक माहितीसाठी सकाळी ११ ते ५ या वेळेत ९४२३८१४६९९ या क्रमांकावर संपर्क साधा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉर्न बाकरवडी

$
0
0

उषा कन्सारा

साहित्य : एक वाटी मक्याचे दाणे, तांदळाची पिठी, १ वाटी दूध, २ चमचे बटर, २ चमचे तीळ, अर्धा चमचा बडीशोप, अर्धी वाडी मक्याचे पीठ, २ चमचे, कॉर्नफ्लोअर, अर्धी वाटी मैदा, दालचिन‌ी पावडर २ चमचे, तळण्यासाठी तेल.

हिरवे वाटण : ४ चमचे कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, हिरवी मिरची, ओलं खोबरं, जीरे, मीठ, आमचूर पावडर, चवीसाठी साखर, चार हिरव्या मिरच्या.

कृती : कॉर्नचे दाणे स्वच्छ धुवून त्यामध्ये थोडे दूध घालून मिक्सरमधून वाटून घ्यावेत. नंतर एका पॅनमध्ये २ चमचे बटर घालून ते चांगले शिजवून घ्यावेत आणि गार करावेत. यामध्ये अर्धी वाटी मक्याचे पीठ, अर्धी वाटी मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ आणि दोन चमचे तुपाचे मोहन घालून हे मिश्रण मळून घ्यावे. हिरवे वाटण व गार झालेला मक्याचा गर एकजीव करुन घ्यावा. मिश्रणाचा गोळा घेऊन पोळपाटावर पोळी लाटावी. त्यावर हे मिश्रण एकसारखे पसरावे आणि त्यावर तीळ पेरावेत. त्यानंतर पोळीची गुंडाळी करून तिचे एकसारखे काप करावेत. या काप केलेल्या वड्या तेलामध्ये तळून घ्याव्यात. टोमॅटो सॉससोबत या बाकरवड्या सर्व्ह कराव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोकणी रस्सा

$
0
0

सौरभ बेंडाळे,

कॉलेज क्लब रिपोर्टर

सपना काशिद मूळच्या कोकणस्थ असल्याने नाशिकमध्ये अस्सल कोकणी पदार्थ मिळावेत यासाठी त्यांनी 'कोकणी रस्सा'ची सुरुवात केली. मालवणी मसाल्यात तयार होणारे मटन, चिकन थाळी, फिश करी, फिश फ्राय, खिमापाव, बोंबिल चटणी, झिंगा चटणी सोबतच सोलकढी इथे सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत उपलब्ध असते.फिश करी

‍नारळाचा खव, थोडे पाणी, हळद, हिरवा मसाला व धने हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घेतले जाते. एका भांड्यात तेल टाकून ते तापल्यावर त्यात कांद्या-लसणची फोडणी घातली जाते. कांदा गुलाबी लालसर होताच त्यामध्ये मिक्सरमधील वाटपामध्ये मासे कालवून ते फोडणीत टाकले जातात. त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून झाकण ठेवले जाते. त्यानंतर थोड्या वेळाने उकळी येण्यापूर्वी चिंचेचा किंवा आमसुलचा थोडासा रस घालून त्यात त्रिफळे व ओल्या मिरचीचे तुकडे घातले जातात. तयार करीमध्ये कोथिंबीरीची पाने घालून फिश करी सर्व्ह होते.फिश फ्राय

पहिल्यांदा मासा साफ करून धुवून घेतला जातो. नंतर त्याला सुरीने आडव्या चिरा दिल्या जातात. त्यातनंतर कोकमाचे आगळ, तिखट, हळद, चवीनुसार मीठ सर्व एकत्र करून माश्याच्या चिरांमध्ये काही वेळ हे मिश्रण लावून ठेवले जाते. त्यानंतर बारीक रवा, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, चवीनुसार मीठ या सर्वांचे सुके मिश्रण तयार करून त्या माश्याला लावून तो मासा नॉन स्टीक तव्यामध्ये दोन्ही बाजूने १०-१५ मिनिटे शॉलो फ्राय करून घेतला जातो. संपूर्ण एक मासाही इथे डिश मध्ये दिला जातो. मालवणी पद्धतीत तयार केलेल्या या फिश फ्रायला नाशिकरांची मोठी मागणी आहे.बोंबील चटणी

सुके बोंबील घेऊन ते स्वच्छ केल्यानंतर बोंबील लांब काड्यांवर (चूल किंवा गॅस) भाजून घेतले जातात. त्यानंतर ते बोंबील एका वाडग्यात घेऊन त्यात हिरवी मिरची, लसूण टाकून जाडसर कुटून घेतले जातात. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात हे कुटलेले बोंबील टाकले जातात. त्यात मिरचीपूड व थोडा मसाला घालत बोंबील चटणी तयार होते. थोडी क्रिस्पी आणि तिखट अशी या चटणीची चव असते.झिंगा चटणी

झिंगे घेऊन ते गरम तवा किंवा कढाईमध्ये घेऊन तेलात भाजले जातात. त्याचवेळी दुसऱ्या कढाईमध्ये तेल गरम करून त्यात जीरे, मोहरीची फोडणी देऊन त्यात कांदा लालसर होइपर्यंत परतवून घेतला जातो व त्यामध्ये टोमॅटो घातला जातो. त्यानंतर त्यात भजलेले झिंगे घालून तिखट, कोकणी मसाला, चिंचकोळ घातला जातो. तयार झिंगा चटणीवर कोथिंबीर टाकून ती गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत सर्व्ह केली जाते. याचीही चव क्रिस्पी आणि तिखट असते.मटन किंवा चिकन थाळी

कोकणातल्या पद्धतीने बनवलेल्या मटन आणि चिकनला नाशिककर खवय्यांची मोठी मागणी असते. मालवणी काळा मसाला घालून तयार केलेले झणझणीत असे मटन किंवा चिकन व यासोबत गरम बाजारीची भाकरी, भात, सोलकढी, रस्सा, आणि ऑर्डर असेल तर त्यात फिश फ्राय अशी ही थाळी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुगरण आईची शिकवणी

$
0
0

पूजा सावंत

थँक यू सो मच... सो मच आई..! आज प्रथमच मी जाहीरपणे आईचे आभार मानतेय. अगदी शाळेत असल्यापासून तिनं मला स्वयंपाकाची गोडी लावली किंबहुना रूजवली माझ्या मनात. इंच-फुटाची फुटपट्टी न वापरता मनापासून स्वयंपाक करायला तिनं शिकवलं. चिरणं, कापणं, सोलण्यापासून ते थेट फोडण्या, वाटणा-घाटणापर्यंत सारं काही.

कधी-कधी पप्पा गमतीनं म्हणतात, 'पूजा तू तर आईपेक्षाही सुंदर स्वयंपाक करतेस.' आई सुगरण आहे याबाबत कुणाचंच दुमत नाही. पोहेही ती चवदार बनवते. चिवडा, बिर्याणी, सागुतीवडे ते थेट गुलाबजाम, पाणीपुरीपर्यंत सर्वच पदार्थ एकदम टेस्टी करते. माझ्या मित्रमंडळींची तर ती एकदम लाडकी आहे. सगळ्या फर्माईशी पूर्ण करते ती खाण्यापिण्याच्या.

पुण्यातल्या 'निसर्ग'ची हटकून याद येते. प्रत्येक डिशचं वेगळेपण जपलंय त्यांनी. चिंबोरीचं कालवण, भाकरी एकदम वरचा क्लास! अलिबागला शूटिंगसाठी गेलेलो तेव्हा मनसोक्त मासे खाल्ले आम्ही. सुरमई आणि पापलेट फ्राय दररोज पानात असायचंच. टिपिकल मालवणी चव हवी तर शिवाजी मंदिर, दादर समोरच्या 'पूर्वा'मध्ये फेरी मारायला हवी. मटणाचा रस्सा, प्रॉन्स फ्राय, सोलकढी, वडे, वाफाळता भात... नुसत्या आठवणीनंही तोंडाला पाणी सुटलंय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटार कटलेट

$
0
0

प्रीतम म्हात्रे

साहित्य

पाच बटाटे, पाव किलो बेसन, चार चमचे तांदळाचं पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची, हळद, एक मूठ जाड पोहे, तीळ, मीठ, तेल, जिरं, मोहरी, हिंग, वाफवलेले मटार

कृती

आधी एका भांड्यात वाफवलेले मटार स्मॅश करून घ्यावेत. मग त्यात आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याची पेस्ट करून घालावी. सोबतच बटाटा, जाडे पोहे, कोथिंबीर, तीळ, हळद, तांदळाचं पीठ, बेसन, चवीनुसार मीठ,‌ थोडा हिंग घालून ‌हे मिश्रण एकजीव करावेत. मग कढईत थोडंसं तेल गरम करून हिंग, जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करावी. ही भांड्यातल्या मिश्रणात घालून ते पुन्हा एकजीव करावं. थोड्या वेळाने मिश्रण थंड झाल्यावर कटलेटच्या साच्यात घालून किंवा हाताने त्याचे छानसे कटलेट बनवावेत. आवडीनुसार कढईत तेलात तळून घ्यावेत किंवा शॅलो फ्राय करावेत. गरमागरम कटलेट सॉस किंवा चटणीसोबत खायला द्यावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मक्याची भजी

$
0
0

शिल्पा पुरंदरे

साहित्य

मक्याचे दाणे, आलं-लसूण-मिरची पेस्ट, हिंग, जिरे, बेसन, तांदळाचं पीठ, तेल, लिंबाचा रस, मीठ.

कृती

मक्याचे दाणे मिक्सरमधून थोडेसे फिरवून घ्यावेत. त्यात आलं-लसूण-मिरचीची पेस्ट, थोडासा हिंग, जिरं आणि बेसन आणि तांदळाचं पीठ घालून ते कालवून घ्यावं. त्यात चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस घालावा. या मिश्रणात थोडंसं गरम तेल घालून ते तेलात तळून घ्यावेत. पुदिन्याच्या चटणीसोबत ही मक्याची भजी फस्त करावीत. ही भजी करताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवावी, ती म्हणजे मका मिक्सरमधून अगदी हलकासा फिरवून घ्यावा. तो जरा जाडाभरडाच राहू द्यावा. अगदी बारीक वाटल्यास त्याची मजा जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठी ओलांडलेले भगवती

$
0
0

सौरभ बेंडाळे, कॉलेज क्लब रिपोर्टर

भगवती हॉटेलमध्ये अस्सल नाशिकच्या पद्धतीने सर्व पदार्थ बनवले जातात. भगवतीची मिसळ जशी फेमस आहे तसेच इथले पिठलं भाकरी, पराठा भाजी हे पदार्थही प्रसिध्द आहेत. इथे मिळणारी उपवासाची मिसळ तर खवय्यांसाठी पर्वणीच. भगवतीचे डिंक लाडू सातासमुद्रपारही फेमस झाले आहेत.

स्पेशल मिसळ

उकडलेली मटकी आणि काळ्या मसल्याची ही मिसळ असते. भाजलेला कांदा, खोबरं, मिरची यांच्यापासून घरी तयार केलेला काळा मसाला वापरुन ही मिसळ बनवली जाते. तयार काळ्या मसाल्याच्या रस्स्यामध्ये ही उकडलेली मटकी वरुन घतली जात असल्याने मटकीची अस्सल चव मिळते. मिसळमध्ये टाकली जाणारी जाड व बारिक शेव मिसळच्या चवीत रंगत आणते. काळ्या मसाल्याची ठसकेदार मिसळ नाशिककरांच्या चांगलीच पसंतीची आहे.उपवासाची मिसळ

शेंगदाण्याचे कूट, हिरवी मिरची, थोडे बटाटे आणि कोथिंबीर टाकून साबुदाणा खिचडी तयार केली जाते. त्यावर बटाट्याच्या किसाचा चिवडा, सबुदाण्याचा चिवडा टाकला जातो. त्यावर हिरवी मिरची, शेंगदाण्याची तिखट चटणी टाकली जाते. या पद्धतीने उपवासाची मिसळ तयार होते. यासोबत आंबट दही सर्व्ह होते. कोणत्याही उपवासाच्या दिवशी भगवतीच्या या उपवास स्पेशल मिसळला मोठी मागणी असते.

पराठा भाजी

गव्हापासून तयार केलेले पराठे त्यासोबत काबुली चना, ग्रीनपीस मसाला, शेवभाजी या भाज्या असतात. मैद्याचा वापर न करता हे पराठे तेलात तयार केले जातात. पराठ्यासोबत इथे ग्रीनपीस मसाल्याला चांगली मागणी आहे. हिरवे वाटाणे घेऊन ते उकडून घेतले जातात. त्यानंतर ग्रेव्ही तयार केली जाते. यात तिखट, कांदा, खोबऱ्याचा मसाला, आलं लसूण पेस्ट घालून ग्रेव्ही तयार होते. तयार ग्रेव्हीमध्ये हे वाटाणे घातल्यावर ग्रीनपीस मसाला तयार होतो. थोड्या तिखट आणि गरमागरम पराठ्याची लज्जत चाखायला नाशिककर इथे गर्दी करत असतात. गुजरातमध्येही इथले हे पराठे फास्ट सर्व्हिसने मागवले जातात.

पिठलं भाकरी

कढईत तेल गरम करुन त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली जाते. जिरे तडतडल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे आणि लसूण घातला जातो. लसूण गुलाबी झाला की कांदा परतून घेतला जातो व त्यामध्ये हळद घातली जाते. त्यानंतर हरभरा डाळीचं पीठ आणि पाणी व्यवस्थित एकजीव केले जाते. कांदा परतवून झाला की यात हे बेसनाचे मिश्रण घालून त्याला उकळी दिली जाते. तयार झालेलं तिखट असं हे पिठलं गरमागरम बाजरीची भाकरी आणि हिरव्या मिरचीच्या झणझणीत ठेच्यासोबत सर्व्ह होतं.

डिंक लाडू

शुद्ध तुपातले डिंक लाडू बनवताना खाण्याचा डिंक तूपात तळून घेऊन घेतला जातो. डिंक तळून उरलेल्या तूपात मूगाचे व सोयाबिनचे पिठ भाजून घेतले जाते. भरडसर वाटलेले बदाम, काजू पिस्ता आणि खारीक तूपात मंद आचेवर भाजून घेतले जातात. सुकं खोबरं कोरडं भाजून घेतलं जातं. जायफळ बारीक किसणीवर किसून तळलेला डिंक, भाजलेले सोयाबिन-मूगाचे पिठ, भाजलेला सुका मेवा, बेदाणे, भाजलेले खोबरे आणि जायफळ पूड एकत्र करून घेतले जाते. कूकरमध्ये एक-दोन शिट्या करुद गूळ पातळसर बनवून घेतला जातो. सर्व मिश्रणामध्ये गूळ मिसळून हे लाडू तयार केले जातात. बाराही महिने इथे ताजे डिंक लाडू मिळतात. अनेक परदेशी पर्यटक हे डिंक लाडू आवडीने खात असल्याचे सुभाष कांबळे सांगतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिलबी अन् भजी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जळगाव

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जळगावमध्ये बरसत असलेल्या पाऊससरींमुळे वातावरणात गारवा आला आहे. अशा वातावरणात गरमागरम पदार्थ खाण्याचा मोह आवरता येत नाही. साहजिकच कॉलेज कॅण्टीन असो वा खाऊचे कट्टे... प्रत्येक ठिकाणी भजी, वडे यांना पसंती मिळत आहे.

पावसाळी हवामानात जिभेचे लाड अधिकच वाढतात. मुगाचे वडे, बेसनाचे कांदा व मिर्चीचे भजी यांना खवय्यांकडून अधिक पसंती मिळू लागते. शहरातील अनेक खाऊ कट्ट्यांवर हे पदार्थ विकले जात आहेत. सकाळी नाश्त्याच्यावेळी या पदार्थांवर मोठ्या प्रमाणात ताव मारला जातो. तेच संध्याकाळी चहाच्या सोबत असतील तर मग काही विचारायलाच नको. या चटपटीत पदार्थांसोबत अनेकांना गोड पदार्थ खाण्याची लहर येते आणि मग मिठाईच्या दुकानांमध्ये नंबर लावून इमरती, जिलबीची मागणी केली जाते. गरमागरम वस्तू खाण्‍याच्या दृष्टीने पावसाळा एकदम मस्त ऋतू आहे. पण त्याचवेळी आरोग्याकडेही दुर्लक्ष करून चालत नाही.

ही घ्या काळजी

> उघड्या असलेल्या वस्तू खाऊ नये.

> पदार्थ तयार होत असलेली जागा स्वच्छ आहे की, नाही हे बघावे.

> माशा होत असतील तर विक्रेत्यांनी काळजी घ्यायला हवी.

> पार्सल न्यायचे असल्यास घरूनच डबा न्यावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकाच्या वड्या

$
0
0

स्वाती मानेगावकर, रसायनी

साहित्य :

एक जुडी पालक, खोबरं, ७ते ८ लसणाच्या पाकळ्या, ५ते ६ हिरव्या मिरच्या, थोडं आलं, कोथिंबीर, हळद, लाल मिरची पावडर, तेल, मीठ, चणा डाळीचं पीठ व तांदळाचं पीठ.

कृती :

पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. खोबरं, लसूण, हिरवी मिरची, आलं व कोथिंबीर यांचं वाटण तयार करावं. चिरलेल्या पालकामध्ये ३ ते ४ चमचे तयार केलेलं वाटण, हळद, लाल मिरची पावडर व थोडं तेल घालावं. त्यात नंतर मावेल तेवढं चणा डाळीचं पीठ, थोडं तांदूळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं एकत्र करा. त्याचे कणकेसारखे लांबट आकाराचे गोळे करा. स्टीलच्या चाळणीला आतून तेल लावून गोळे त्यात ठेवावे. एका गंजात पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवून १०-१५ मिनिटे हे गोळे वाफवून घ्यावे. त्यानंतर गॅसवरुन उतरवून ते थंड झाल्यावर त्याचे गोल आकारात काप करून तेलात तळावे किंवा परतावे. टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करावे.

(वाफवलेले गोळे फ्रीजमध्ये ३-४ दिवस राहू शकतात. फ्रीजमधून काढून अर्धा तास बाहेर ठेवल्यावर काप करून तळावे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मसाला स्टफ इडली

$
0
0

साधना गंटी

साहित्य:

इडलीचे पीठ दोन वाट्या, एक वाटीभर गाजर, बीन्स आणि मटार, आलं-लसूण-मिरची पेस्ट, तेल, मीठ, थोडी साखर, कोबीची पानं, तीळ, सोडा.

कृती:

प्रथम इडलीच्या पीठात मीठ, साखर आणि आलं-लसूण-मिरची पेस्ट घालून घ्यावी. तेलावर सर्व भाज्या हलक्याशा परतून घ्याव्यात. या भाज्यांमध्ये हवा असल्यास मीठ-मसाला घालावा. इडली पात्रात थोडं इडलीचं मिश्रण घालावं. त्यावर कोबीचं पान ठेऊन परतलेल्या भाज्या घालाव्या. वरून पुन्हा इडलीचं पीठ घालावं. कुकरमध्ये या इडल्यांना मस्तपैकी १५ मिनीटं वाफ काढावी. गरमागरम इडल्या सॉस किंवा चटणीसोबत खाव्यात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिरंगी सलाम

$
0
0

अनुराधा कदम

स्वातंत्र्य दिन म्हटले की जिलेबीचा गोडवा हे समीकरण ठरलेलेच. पण बदलत्या चवीरवींच्या खवय्यांसाठी स्वातंत्र्यदिनाचा गोडवाही तशा पद्धतीचा झाला आहे. कोल्हापुरातील विविध स्नॅकस्पॉट, हॉटेल्स आणि केकशॉपीजमध्ये तीन रंगांतील ही खवय्येगिरी करता येणार आहे.

वेफर चकली

कुरकुरीत वॅफीची चव देणारी चकली म्हणजे आपल्या नेहमीच्या खमंग चकलीचे फ्यूजन. तांदळाच्या पिठापासून बनवलेली ही चकली जिलेबीच्या शेपमध्ये बनवून तिला तिरंगी लूक दिला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या खास फराळात ही चकली हवीच अशी आहे. शिवाजी पेठेतील जयभवानी स्वीटसने हा वेगळा प्रयोग केला आहे.

फॅमिली संडे

आइस्क्रिम लव्हर्ससाठी मँगो, व्हेनिला आणि पिस्ता फ्लेवरमध्ये तिरंगा आईस्क्रिम बनवले आहे बीके पाटील यांच्या कूल हाऊसमध्ये. सोबत चेरी आणि वेफर ची सजावट आहे. या तीन रंगातील कॉम्बो आईस्क्रिमची खास रेंज १५ ऑगस्टसाठी तयार करण्यात आली आहे. राजेंद्र पाटील यांनी तीन नेहमीच्या आईस्क्रिमला एकत्र आणत नवीन तिरंगी लूकमध्ये बाऊलमध्ये सजवले आहे.

कप केक

सासने ग्राउंड परिसरातील जस्ट बेक येथे खास तीन रंगातील कपकेक आहेत. शुगर बॉल्सची सजावट आणि भगवा, पांढरा आणि हिरवा या ​तीन रंगाचे कॉम्बिनेशन अफलातून जुळून आले आहे. जस्ट बेकच्या सूरज तनवाणी यांनी खास १५ ऑगस्टसाठी हा हटके कप केक ड्रायफ्रूटसोबत तयार केला आहे.

तिरंगी मलई बर्फी

जोधपूर मिष्ठान्नने १५ ऑगस्टचा गोडवा वाढवण्यासाठी तिरंगी मलई बर्फी तयार केली आहे. कोल्हापुरात स्वीटप्रेमीही भरपूर आहेत. त्यांच्यासाठी ही मलई बर्फी म्हणजे पर्वणी असेल. मलई फ्लेवरमध्ये असलेल्या बर्फीला ड्रायफ्रूटचीही टेस्ट आहे. पण ही लक्ष वेधून घेत आहे ती तिच्या तीन रंगांनी.

मोदक

पांढऱ्या रंगाचा मोदक आपल्याला माहितीच आहे, पण याच पारंपरिक चवीच्या मोदकाला तिरंगी टच देत याची गोडी अधिकच वाढवली आहे खास स्वातंत्र्यदिनासाठी गृहिणी वस्तू भांडारच्या उमा देसाई यांनी. खोबऱ्याचा खीस, गूळ आणि सुकामेवा यांच्या जोडीला या मोदकाची लज्जत वाढवली आहे ती तिरंगी लूकमुळे. हा मोदकही स्वातंत्र्यदिनासाठी तयार आहे.

पेस्ट्री केक

हॉकी स्टेडियम परिसरातील कॅफे चिल आऊटमध्ये खास स्वातंत्र्यदिनानिमित्त​ तिरंगा पेस्ट्री केक मिळणार आहे. नेहमीच्याच पेस्ट्रीला फक्त तीन रंगांत तयार केल्यानंतर त्याचा लूक किती आकर्षक होतो हे या केकमध्ये दिसेल. शिवाय फ्लेवर्ड आयसिंग आहेच. जीवन सावंत यांच्या कल्पनेतून हे पेस्ट्रीज तयार झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडे वाल

$
0
0

>> यशश्री साठे, इंदिरानगर

वडे वाल

साहित्य :

वालाच्या हिरव्या शेंगा पाव किलो, १ वाटी हरभरा डाळीचे पीठ, हिंग, लाल तिखट, हळद , डावभर तेल, मोहनसाठी दोन चमचे तेल, चवीनुसार मीठ, चवीपुरता गूळ, चार चमचे दही, जीरपूड, ओवा, काळे तीळ चवीपुरते.

कृती :

वालाच्या शेंगा निवडून बारीक सोलून घ्याव्यात. एका जाड बुडाच्या कढईमध्य डावभर तेल घ्यावे. त्यात या शेंगा फोडणीला टाकाव्यात. चवीपुरते मीठ घालून मंद आचेवर शिजायला ठेवाव्यात.

त्यानंतर एक वाटी डाळीचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, जीरपूड, ओवा, काळे तीळ, लाल भरड तिखट, दही, हळद व तेल घालून पोळ्यांना कणिक भिजवतो त्याप्रमाणे गोळा करुन घ्यावा. या पिठाचे छोटे छोटे वडे करावेत. शिजत असलेल्या भाजीमध्ये हे वडे घालावेत. सगळं मंद शिजल्यावर थोडं लाल भरड तिखट घालून चमचमीत वडे वाल भाजी गरमागरम भाकरीसोबत खावी.

केळ्याचं घावन

साहित्य :

पिकलेली केळी ५ ते ६, तेल, अर्धी वाटी गूळ, तांदळाचे पीठ, चवीपुरते मीठ व मिरपूड

कृती :

५ ते ६ पिकलेली केळी किसून घ्यावीत. त्यात चवीपुरते मीठ, किसलेला गूळ व थोडी मीरपूड घालावी. हे सर्व मिश्रण चांगले कालवून घ्यावे. मिश्रणामध्ये मावेल एवढे तांदळाचे पीठ मिसळावे. गरज असेल तर पाणी घालून हे पीठ सरसरीत करावे. जाड बीडाच्या तव्याला तेल लावून हा तवा मंद गॅसवर ठेवावा. या तव्यावर गोल आकारामध्ये मिश्रण पसरावे. दोन्ही बाजूने घावन खरपूस भाजावे. साजूक तुपासोबत हे घावन खावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपवासाची कोल्हापुरी खासियत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

श्रावण महिना म्हणजे सणवार, व्रत वैकल्ये आणि उपवासाचा महिना. त्यामुळे या महिन्यात उपवासाच्या पदार्थांचीही मोठ्या प्रमाणावर रेलचेल असते. उपवास म्हणजे पोटाला विश्रांती नव्हे, तर चवीत बदल असा आपल्या जिभेच्या सोयीचा अर्थ आपण घेतल्याने उपवासासाठी आपण नेहमीच तयार असतो. त्यामुळेच उपवासाच्या पदार्थांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. उपवास म्हटलं की, शाबुदाण्याची खिचडी हा तोचतोचपणा टाळण्यासाठी दर सोमवारी नवा पदार्थ काय करायचा हा प्रश्न बाजारातील उपवासाच्या पदार्थांनी मिटवला आहे.

बाजारात केळी, राजगिरा लाडू, बटाटा चिवडा, बटाटा शेव, केळीचे वेपर्स, खजूर, रताळी, चिक्की, शेंगदाणे अशा पदार्थांची मागणी वाढली आहे. फळांसोबत खजूर, रताळे यांची खास आवक झाली आहे. याचबरोबर राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ, शेंगदाणे, साबूदाणे असे पदार्थ किरणा दुकानांमधून खरेदीसाठी रविवारी गर्दी झाली होती. काहींनी खजूर व ड्रायफ्रूटलाही पसंती दिली.

उपवासाचे थालीपीठभगर, साबुदाण्याची खिचडी, राजगिऱ्याचे लाडू हे खाण्याचा अनेकदा कंटाळा येतो. त्यामुळेच उपवासाच्या थालिपीठाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. भगर, साबुदाणा आणि राजगिरा यामध्ये थोडे जीरे टाकून हे सर्व एकत्र करुन त्याचे पीठ दळून आणले जाते. हिरवी मिरची, कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट मिसळून हे पीठ थोडे सैलसर मळले जाते व तव्याला तूप लावून त्यावर हे थालिपीठ भाजले जाते. या थालीपीठाची चव वाढविते ते दही, ओलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर यांच्यापासून बनलेली चटणी. या चटणीबरोबर दिलं जाणारं हे थालपीठ म्हणजे उपवासालाही पोटभर खाणं. असे तयार पीठ दुकानांमध्ये उपलब्ध आहे, तसेच गृहिणींनी खास श्रावणी बेगमी म्हणून तयार करून ठेवले आहे.डिंक लाडू, खोबऱ्याची वडी आणि चिवडाउपवासाला कितीही पोटभर खाल्लं तरी उपवसाचे काही पदार्थ असे असतात जे आपण कधीही खाऊ शकतो. डिंक, खोबरं, सुका मेवा यांच्या मिश्रणापासून साजूक तुपामध्ये बनविलेले ड‌िंकाचे लाडू ओल्या नारळाच्या खोबऱ्यापासून बनविलेली खोबऱ्याची बर्फी खास तयार झाली आहे. उपासाच्या चिवड्याच्याही अनेक व्हरायटी तुम्हाला या ठिकाणी मिळतील. बटाट्याचा गोड व तिखट चिवडा, साबुदाण्याचा चिवडा, साबुदाणा व बटाट्याचा मिक्स चिवडा असे चिवड्याचे प्रकारही स्वीटमार्टमध्ये तयार झाले आहेत. बटाट्याचा कच्चा चिवडा, साबुदाण्याचे सांडगे, बटाटा साबुदाण्याची पापडी, फणसाचे तळलेले गरे, राजगिरा लाडू यासारखे उपवासाचे पदार्थ श्रावणातील पोटभरू वेळेसाठी जिभेवर रेंगाळणार आहेत. कोल्हापुरात श्रावण सोमवारचा उपवास सायंकाळी सातच्या सुमारास सोडला जातो. सकाळी उपवासाच्या पदार्थाचा बेत आणि सायंकाळी

गोडाधोडाची रेलचेल. मग दर सोमवारी उपवासाच्या पदार्थात वैविध्य असावे असे नियोजन घरोघरी केले जाते. त्यासाठी पॅटीस, थालीपीठ, शाबुदाणा वडे, उपवासाची मिसळ, रताळ्याचे वडे इथंपासून सुरू होणारी यादी अगदी ड्रायफ्रूट वडी, खोबऱ्याचे सारण भरून केलेले बटाट्याचे कोफ्ते इथपर्यत वाढते.

शुगर फ्री उपवास

मधुमेहाचे रुग्ण असलेल्यांचाही उपवास साग्रसंगीत गोड व्हावा यासाठी बाजारात शुगर फ्री पदार्थ तयार आहेत. यामध्ये वड्या, बर्फी, खीरमिक्स यांना जास्त मागणी आहे. राजगिरा चिक्की, शेंगदाणा चिक्की यामध्येही शुगरफ्री स्वीट वापरण्याचा ट्रेंड इन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खमंग सोजी

$
0
0

>>तन्मय टिल्लू

श्रावण महिना म्हटलं की, बालकवींच्या कवितेपासून व्रत वैकल्यांपर्यंत अनेक गोष्टी आठवतात. चोहीकडे दाटलेल्या हिरवळीमु‍ळे या आनंदात भरच पडते. श्रावण हा सण उत्सवांचा महिना असल्यामुळे उपवासाच्या आणि बिन उपवासाच्या पदार्थांची रेलचेल असते. श्रावणी सोमवार आणि शनिवार, त्याचबरोबरीने भरपूर सणही आहेत. त्यानिमित्ताने घरात विविध पक्वान्नं बनतात. खरं तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस साजरा केला जातो. प्रत्येक दिवसाचं वैशिष्ट्य आहे आणि काही घरांत महिनाभर दररोज पक्वान्न बनवून नैवेद्य दाखवला जातो. या महिन्यात शक्यतो कांदा- लसूण न घालता पदार्थ बनवले जातात.

श्रावणातील सोमवारी पूर्वी धान्य फराळ केला जात असे. तसेच भाजका स्वयंपाक करून घरातील मोठे उपास करत. या दिवशी उपासाला 'वरई' वर्ज्य असे. सोमवारी शक्यतो सोजी किंवा खिचडी आणि भाजक्या डाळीची आमटी केली जाते. यातीलच पहिला प्रकार आहे 'सोजी'...

लापशीचा रवा, गूळ, खोवलेले खोबरे (नारळ) जिरे, हळद, पाणी आदी साहित्य वापरून सोजी केली जाते. सोजी हा खिरीसारखा पदार्थ कोकणात खास धार्मिक कार्यात करण्याची प्रथा आहे. पूर्वी लग्नसमारंभ घरीच अंगणात केले जात. त्यावेळी प्रमुख पदार्थ म्हणजे भात, वाटाण्याचे सांबार (काळे वाटाणे) आणि सोजी असत. आजही सोजी, घावने- रस असे पदार्थ नैवेद्यासाठी केले जातात.

रवा चांगला भाजून त्यावर गरम पाणी घालून ढवळावे, थोडेसे शिजत आल्यावर त्यात किसलेला गूळ घालून, त्यात खोबरे, हळद, जिरे एकत्र बारीक वाटून घातली आणि चवीपुरते मीठ घातले जाते. खिरीसारखे घट्ट होईपर्यंत मिश्रण शिजवले जाते आणि वरून तूप आणि वेलची पावडर घातली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 1266 articles
Browse latest View live


Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>