कृती - उडीद डाळ पाण्यात भिजवून पटकन सुती कापडाने कोरडी करा. मऊ होईपर्यंत पाण्यात ठेवू नका. नंतर १५ ते २० मिनिटे पंख्याखाली सुकवून घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये काजू, बदाम व पिस्ता भाजून घ्या व बाऊलमध्ये काढा. त्याच पॅनमध्ये ओट्स व उडीद डाळ वेगवेगळी खरपूस भाजून घ्या. नंतर त्यांची मिक्सरमध्ये वेगवेगळीच बारीक पूड करून घ्या. आता मध्यम आचेवर पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये ५ मिनिटे रागीचे पीठ भाजून घ्या. नंतर त्यामध्ये ओट्स, उडीद डाळ, सुकमेव्याची पूड, वेलचीपूड व जायफळपूड घालून २ मिनिटे परता. त्यामध्ये गूळ किसून घाला. गूळ वितळू लागला की गॅस बंद करा नाहीतर लाडू कडक होतील. नंतर मिश्रण गरम असतानाच त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं वितळलेलं तूप घालून लाडू वळून घ्या. बाप्पासाठी आणि तुमच्या पोटोबासाठी रुचकर आणि आरोग्यदायी लाडू तयार !
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट