दिवाळीत शेव-चिवडा जरा जास्तच केला जातो... मग प्रश्न पडतो, उरल्यावर त्याचं काय करायचं? तर... जराही काळजी करू नका. शेव-चिवडा उरला असेल तर पुढील गोष्टी करा...
- आठवड्यातून एकदा घरी उपमा होतोच... तेव्हा शेव-चिवडा उरला असेल, तर तो उपम्यावर मस्त पसरा, उपमा छान लागतो.
- पोहेसुद्धा नाश्त्यासाठी केलेच जातात. तेव्हा गरमागरम पोह्यांवर नुस्ती शेव किंवा शेव-चिवडा टाकून खायला हरकत नाही. पोह्यांची टेस्ट आणखी वाढते.
- शेव-चिवडा उरला असेल तर मटकीची उसळ नक्की करा. त्यात जरा तर्री ठेवा. म्हणजे मटकीची उसळ आणि वर शेव-चिवडा टाकून मस्त मिसळ करता येईल.
- याशिवाय जरा वेगळं कॉम्बिनेशन म्हणून साबुदाणा खिचडीवरही शेव टाकायला हरकत नाही... वेगळीच चव मिळते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट