Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

शाही ड्रायफ्रुट मोमोज विथ केसरिया रबडी

$
0
0

साहित्य (दोन जणांसाठी) -

मोमोजसाठी - एक वाटी जाडसर कुटलेला सुका मेवा(अक्रोड, काजू, बदाम, मनुका), २-३ चमचे गुलकंद, ४ खजुराचे बारीक काप, पाव चमचा वेलची पावडर, दीड वाटी मैदा, पाऊण वाटी मिल्क पावडर, २ चमचे साजूक तूप, गरम दुधात भिजवलेल्या १२-१५ केशराच्या काड्या, पाव वाटी कंडेन्स्ड मिल्क, आवश्यकतेनुसार दूध, थोडासा खाण्याचा पिवळा रंग

केशर रबडीसाठी - दोन वाट्या सायीचं दूध, पाऊण वाटी कंडेन्स्ड मिल्क, गरम दुधात भिजवलेल्या १०-१२ केशराच्या काड्या, पाव चमचा वेलची पावडर, सजावटीसाठी सुकामेवा

कृती - प्रथम एका बाऊलमध्ये मैदा, मिल्क पावडर, कंडेन्स्ड मिल्क, केशर भिजवलेलं दूध, तूप हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यात आवश्यकतेनुसार दूध व आवश्यकता असल्यास थोडा खाण्याचा पिवळा रंग टाकून मैदा मऊसर भिजवून घेणे. साधारण अर्धा तास मुरण्यासाठी झाकून ठेवणे. तोपर्यंत एका बाऊलमध्ये सारणासाठी सुका मेवा, गुलकंद, खजुराचे काप व वेलची पावडर एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घेणे. नंतर रबडी बनवण्यासाठी एका पसरट पॅनमध्ये दूध उकळत ठेवणे. दुधाला एक उकळी आल्यानंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क, वेलची पावडर, दुधात भिजवलेल्या केशराच्या काड्या टाकून दूध घट्ट होईपर्यंत उकळू द्यावे (दूध उकळत असताना मध्ये मध्ये चाळवत राहावे). तयार रबडी रूम टेम्परेचरला आल्यावर थोडा वेळ फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवावी. नंतर भिजवलेल्या मैद्याची पुरी लाटून त्यात सारण भरुन हव्या त्या आकाराचे मोमोज बनवून घेणे. नंतर एका पातेलीत अर्ध्यापेक्षा जास्त पाणी घेऊन पाणी उकळत ठेवावे. पाणी उकळल्यावर एका चाळणीला तुपाचा हात फिरवून त्यात मोमोज रचून ती चाळणी पातेलीवर ठेवावी. नंतर वर झाकण ठेवून मोमोज उकडीच्या मोदकाप्रमाणे १०-१२ मिनिटे वाफवून घेणे. तयार मोमोज रूम टेम्परेचरला आल्यावर १०-१५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून हलकेसे थंड करून घेणे. नंतर ते मोमोज सर्विंग प्लेटमध्ये रचून सुक्या मेव्याने सजवावे आणि केशर रबडीसोबत सर्व्ह करावे.

- अजिंक्य शेंडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>