साहित्य- एक बाऊल सोया चंक्स, दोन कांदे, २ टोमॅटो, १ बीट आणि गाजर, दोन चमचे आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणे-जिरे पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, कोथिंबीर, दोन चमचे साय, मीठ,
फोडणीसाठी साहित्य- तमालपत्र, मोहरी, हिंग, तेल आणि चिमूटभर ओवा.
कृती- प्रथम सोया चंक्स कोमट पाण्यात दहा ते पंधरा मिनिटं भिजत ठेवा. नंतर स्वछ धुऊन कुकरमध्ये उकडून घ्या. दुसरीकडे तेलात तमालपत्र, मोहरी, हिंग, हिरवी मिरची-आलं-लसूण पेस्ट घालून चांगलं परतवून घ्या. थोडीशी वाफ आल्यावर सर्व मसाले टाकून तेल सुटेपर्यंत परतवून घ्या. नंतर उकडलेले सोया चंक्स मिक्सरमध्ये थोडे फिरवून घेतल्यानंतर मसाल्यात परतवा. शेवटी मीठ, कोथिंबीर, साय आणि ओवा टाकल्यावर बुर्जी तयार. भाकरी, पाव कशाबरोबरही बुर्जी छान लागते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट