Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

चटकदार रीव्हर्स वडापाव

$
0
0


साहित्य - ४ व्हाइट ब्रेड स्लाइस, बेसन, हिरवी चटणी, लाल सुकी चटणी, ६ पाकळ्या बारीक चिरलेला लसूण, आल्याचा तुकडा ठेचलेला, कढीपत्ता, १ कांदा बारीक चिरलेला, बेकिंग सोडा, हिंग, जिरे, मोहरी, हिरवी मिरची बारीक चिरलेली, मीठ, ४ उकडून कुस्करलेले बटाटे, कोथिंबीर बारीक चिरलेली, तेल.

भाजीची कृती - प्रथम पॅनमध्ये १ टेबलस्पून तेल गरम करायला ठेवा. तेल तापले की, त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, लसूण, आले, हिरवी मिरची, कांदा व हळद घालून नीट ढवळून एक करा. कांदा लालसर झाला की त्यात कुस्करलेला बटाटा घाला व मिश्रण नीट परतवत राहा. नंतर आवश्यक तेवढे मीठ घाला आणि झाकण ठेवून एक वाफ काढा. मग कोथिंबीर घाला व गॅस बंद करा.

बेसनाचा घोळ - एका बाऊलमध्ये बेसन घ्या. त्यात १/२ टीस्पून प्रत्येकी बेकिंग सोडा, हळद व मीठ घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून बेसनाचा घोळ तयार ठेवा.

सँडविच कृती - ब्रेड स्लाइसच्या कडा कापून घ्या व चार चौकोनी तुकडे करा. एका तुकड्यावर हिरवी चटणी लावा व त्यावर लाल चटणी टाका. दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवा. अशाप्रकारे सर्व सँडविच करुन घ्या. आता पॅन गॅसवर गरम करायला ठेवा व त्यात थोडे तेल घालून पसरवा. तेल तापल्यावर तयार छोटे सँडविच दोन्ही बाजूनी भाजून घ्या.
कृती - वरील तयार भाजीचे गोळे करुन तयार ठेवा. एक गोळा घेऊन हातावर त्याची पाती करा व पातीवर वरील सँडविच ठेवा. वरुन दुसरी पाती ठेवा व सँडविच बटाट्यानी नीट बंद करुन हलक्या हाताने दाबा. अशाप्रकारे सर्व सँडविचचे वडे तयार करून घ्या. कढईत तळण्यासाठी मध्यम आचेवर तेल तापायला ठेवा. आता प्रत्येक वडा बेसनाच्या घोळात बुडवून तेलात तळून घ्या व मधून कापून चटणी किंवा सॉसबरोबर गरम गरम सर्व्ह करा.

- प्रीती कारगांवकर, ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>