कृती : सगळ्यात आधी सोयाबीन वड्या जराशा उकडून घ्याव्यात. मका आणि तांदळाचे पीठ एकत्र करून, त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला टाकून, जरासं घट्ट मिश्रण बनवून घ्या. मग त्यात उकडलेल्या सोयाबीन वड्या टाकून ते सर्व तयार पीठ वड्यांना लागेल असं बघा. नंतर गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत छान कुरकुरीत तळून घ्या. कांदा आणि सिमला मिरची चौकोनी आकारात कापून ते सुद्धा मध्यम स्वरूपात तळून घ्या.
बारीक चिरलेला कोबी, लसूण, हिरवी मिरची एकत्र दुसऱ्या कढईत अथवा फ्राय पॅनमध्ये छान एकत्र गरम करून, त्यात सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस टाकून छान गरम करा. त्यात आता तळलेल्या सोयाबीन वड्या, कांदा, सिमला मिरची टाकून छान एकत्र जरा गरम करा, मग त्यावर सफेद तीळ घालून सर्वाना गरम गरम सर्व्ह करा.
अगदी पनीर चिलीची चव ह्या सोयाबीन चिलीला येते, नक्की करून बघा!
- हेरंब मारुती प्रधान, सानपाडा - नवी मुंबई
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट