पाव किलो घेवडा भाजी, एक मोठी वाटी भिजवलेली चणाडाळ, आल्याचा छोटा तुकडा, कोथिंबीर, कढीपत्ता, चार हिरव्या मिरच्या, दोन चमचे लाल तिखट, अर्धा हळद, चवीपुरती साखर, एक लिंबू, दोन चमचे तांदाळचं पीठ, अर्धी वाटी ओलं खोबरं जिरं, तेल, मीठ
कृती :
घेवडा घेऊन, प्रत्येक घेवड्याचे दोन भाग करावे (दोन वेगवेगळे भाग करू नयेत) आणि घेवड्याची एक बाजू उघडून ठेवावी- सारण भरण्यासाठी! नंतर भिजवलेली चणाडाळ घेऊन तिच्यात मिरच्या,कोंथिबीर, कढीपत्ता, जिरं, ओलं खोबरं घालून हे सर्व साहित्य मिक्सरमधून वाटून घ्यावं. मात्र जास्त बारीक वाटू नये. वाटण थोडसं भरडच ठेवावं. त्यानंतर ह्या मिश्रणात हळद, लाल तिखट, तांदाळाचं पीठ, मीठ घालावं. तसंच लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करावं.
अशाप्रकारे सर्व सारण तयार झाल्यावर, ते घेवड्याच्या प्रत्येक शेंगेमध्ये भरून घेवडा उकडून घ्यावा. घेवडा उकडल्यावर तव्यावर शॅलो फ्राय करावा किंवा तेलात तळला तरी चालतो. हा गरमागरम भरलेला फ्राय घेवडा चवीला मस्त खमंग लागतो.
- ऋतुजा रवींद्र गवस, नवी मुंबई
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट