Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

रेसिपी: असे तयार करा मूगडाळीचे झटपट मोदक

$
0
0


मोदक सगळ्यांनाच आवडतात, परंतु उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक करताना त्यात कष्ट खूप असतात. तसंच वेळही खूप जातो. हाताशी वेळ असेल तर उकडीचे किंवा तळणीचे मोदक करायला हरकत नाही. परंतु झटपट मोदक करायचे असतील, तर मूगडाळीच्या मोदकांचा पर्याय अगदी उत्तम आहे.

साहित्य :
२०० ग्रॅम मूगडाळ, २०० ग्रॅम गूळ, ५० ग्रॅम मावा, वेलची-जायफळ पूड अर्धा चमचा, १०० ग्रॅम ड्राय फ्रूट, पाव किलो तूप, दूध १ वाटी

कृती :
प्रथम मूगडाळ ८ ते १० तास भिजत घालणे. नंतर मिक्ससरवर जाडसर वाटून घेणे. डाळ वाटून झाली की, गॅस चालू करून कढई ठेवणे. कढईत तूप टाका. तूप वितळल्यावर वाटलेली मूगडाळ टाकून ती तुपावर छान परतून घ्या. मूगडाळीला मस्त लालसर रंग आला की त्यात मावा, गूळ, दूध टाकून सर्व मिश्रण नीट एकजीन करा आणि सतत ढवळत राहा. कढईतलं मिश्रण थोडं सुकं होत आलं आणि कडेने सुटू लागल्यावर गॅस बंद करा. नंतर कढईतलं मिश्रण एका ताटात काढा. ते साधारण थंड होत आल्यावर, मोदक साच्यात भरून मध्यभागी ड्रायफ्रूटचे बारीक तुकडे घालून साचा बंद करा. हे साच्यातले गुळाचे मोदक खूप छान लागतात.

टीप : या मोदकात साखर न घालता गुळाचा वापर केला आहे, कारम गुळामुळे या मोदकांना एक छान चव येते.

स्मिता शशिकांत कदम, चेंबूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles