साहित्य : १ कप साखर आणि त्यासाठी पाऊण कप पाणी, १/२ कप कॉर्न फ्लोर आणि त्यासाठी सव्वा कप पाणी, १ टीस्पून लिंबाचा रस, १ टीस्पून वेलची पावडर, १ टेबलस्पून सुका मेवा काप करून, ४ चमचे साजूक तूप, तुमचा आवडता एखादा रंग पाव चमचा.
कृती : (सर्व प्रथम कॉर्नफ्लोर आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून त्याच्या गुठळ्या न होता एक पातळसर मिश्रण बनवून बाजूला ठेवून द्या.) एका नॉनस्टिक पॅनमध्ये साखर आणि पाणी घेऊन ते मध्यम आचेवर ठेवून साखर वितळू द्यावी अंदाजे ५ ते ७ मिनिटे. साखर विरघळली की त्यात लिंबाचा रस घालून ढवळावे. आता या साखरेच्या मिश्रणात कॉर्नफ्लोरचे तयार मिश्रण हळूहळू घालून सतत ढवळत राहावे, अंदाजे १० मिनिटे. मिश्रण एकजीव झाले की त्यात चमचाभर तूप घालून ढवळावे. ३ ते ४ मिनिटांनी परत एकदा चमचाभर तूप घालावे, असे ४ वेळा करावे. नंतर या मिश्रणात खायचा रंग(तुम्हाला आवडेल तो) आणि सुक्या मेव्याचे काप आणि वेलची पूड घालून सतत ढवळत राहावे. मिश्रण तूप सोडून गोळा होऊ लागते (हलव्याचे मिश्रण जितका जास्त घट्ट होईल तितका खाताना चिवट लागेल, तेव्हा आपल्या आवडीनुसार consistancy ठेवा.). मिश्रण गोळा झाले की एका टिनला तुपाचा हात लावून त्या टिनमध्ये तयार मिश्रण एकसारखे पसरवून घ्या, वरून अजून सुक्या मेव्याचे काप घालू शकता. ३ ते ४ तास हे मिश्रण रूम टेंपरेचरवर ठेवून द्या. नंतर सेट झालं की हव्या त्या आकारात कापून सर्व्ह करा. हा मुंबई-कराची हलवा एकदम मस्त लागतो.
शीतल राऊत, वसई
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट