पुणे शहर आणि आसपासचा परिसरही खवैय्यांची रसना तृप्त करणारा आहे. शहरापासून म्हणजे २५ ते ३० किमीच्या अंतरापर्यंतही जाऊन आपण आपल्या जिभेचे चोचले पुरवू शकतो. सातारा रोड, सिंहगड रोड, मुळशी रोड, नगर रोड अशा वेगवेगळ्या रस्त्यांवर काही विशिष्ट हॉटेल्स, ढाबे आपल्याला खेचून नेतात.
↧