दाळ-भात, भाजी-पोळी सोबत लोणचं, कांदा, कोशिंबिर... मग 'स्वीट डीश' पोटात उतरताच भरलेलं पोट आणि तृप्त झालेल्या मनाची बातच काही खास असते. अर्थात 'पूर्णान्ना'तून मिळणारा जेवणाचा आनंद काही औरच असतो. नाशिककरांची ही गरज ओळखून नाशिकच्या काही लंच होम्स व हॉटेल्सने 'व्हेज थाळी'च्या माध्यमातून खाद्यसंस्कृतीत भरच टाकलीय. चाळीस वर्षापासून सुरू असलेल्या या 'थाळी'त अलिकडे बरेच मेन्यू आलेत.
↧