जानेवारी हा संपूर्ण महिना कडाक्याच्या थंडीचा, त्यामुळे या महिन्यात पहाटेचा खुराक अगर सकाळच्या न्याहरीसाठी मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, भिजवलेले बदाम, काजू यांना प्राधान्य दिले जाते. याबरोबरच खाद्यसंस्कृतीची जोड असलेला एक पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहे तो म्हणजे गुळपोळी. भोगी व संक्रांतीला आवर्जून गुळपोळी खाल्ली जातेच; परंतु संपूर्ण हिवाळाभरही ही पोळी खाण्याचा प्रघात आहे.
↧