साहित्य - १५० ग्रॅम शिजलेला भात, एक छोटासा आल्याचा तुकडा, दोन-तीन हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, ८० ग्रॅम शिजलेली हरभरा डाळ, २५० ग्रॅम गव्हाचे पीठ, लोणी, चवीनुसार मीठ.
कृती - एका स्टीलच्या भांड्यात भात घेऊन त्यामध्ये आले किसून कोथिंबीर, हिरवी मिरची, शिजलेली हरभरा डाळ आणि मीठ टाकून एकजीव करावे. त्यानंतर पीठ मळून त्याचे छोटे छोटे गोळे करून त्यात भाताचं मिश्रण भरा. या गोळ्यांचे पराठे लाटून मंद गॅसवर लोणी टाकून भाजून घ्या. सॉस आणि चटणीसोबत हे भाताचे पराठे फस्त करा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट