Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

शाळेची आठवणीतली खादाडी

$
0
0

नेहा जोशी, अभिनेत्री

शाळेची परीक्षा संपली, की आम्ही सेलिब्रेशन करायचो. मेन्यूसुद्धा ठरलेला, नारळपाणी आणि बर्फाचा रंगीबेरंगी गोळा. क्लास सुटल्यावर सायकल हातात पकडून चालता-चालता फस्त केलेले ते जाळीचे वेफर्स आठवणीत रेंगाळताहेत.

आमचा पाच मैत्रिणींचा ग्रुप होता. शाळेमध्ये कधी एकदा मधली सुट्टी होतेय आणि एकदाचे डब्बे उघडतोय असं व्हायचं. प्रत्येकीच्या डब्यातली चव वेगळी. खूप मजा यायची, एकत्र डबे खायला. तेव्हा पाण्याचा पेप्सीकोला पन्नास पैशाला आणि दुधाचा एक रुपयाला मिळायचा. पैसे साठवून-साठवून खाल्लेला तो दुधाचा पेप्सीकोला आज आठवणीनंही मनाला गारवा देऊन जातो.

परीक्षा संपली, की आम्ही सेलिब्रेशन करायचो. आमचा मेन्यूसुद्धा ठरलेला, नारळपाणी आणि बर्फाचा रंगीबेरंगी गोळा. क्लास सुटल्यावर सायकल हातात पकडून चालता-चालता फस्त केलेले ते जाळीचे वेफर्स आठवणीत रेंगाळताहेत.

माझ्या बालपणी आमचं एकत्र कुटुंब होतं. तीन काकू, आजी, आई. नुसती चंगळ खाण्यापिण्याची. आजोबांना रोज न चुकता गोड लागायचं. त्यात माझा वाटा ठरलेलाच! जग पालथं घातलं, तरी आजीनं कालवून दिलेल्या गोडवरण तुपाची चव कशालाच नाही. आईच्या हातची साबुदाण्याची खिचडी, पराठे, दहीभात, गुळपोळी, उकडीचे मोदक सारंच अफलान. साध्या पोळ्याही आई एकदम 'वरचा क्लास' करते. माझा मूड वगैरे लागला, तरच मी किचनमध्ये रमते. चीझचिली सँडविच, चिकन, पराठे वगैरे बनवते. कॉफी मात्र नंबर वन बनवू शकते मी.

पुण्याला आले, की 'गुडलक'चा खिमापाव आणि चॉकलेट मूज खातेच खाते. 'फिश करी राइस' मधले माशांचे प्रकार तर अफलातून असतात. त्यांच्या चटण्या, कोशिंबीरी तर बोट चाटावी अशाच! लॉ कॉलेजचा 'कृष्णा' माझी ब्रेकफास्टची चॉइस आहे. नाशिकला मिळणाऱ्या नाना ठिकाणच्या मिसळीचे जॉइट माझे लाडकेच. त्यातल्या त्यात महामार्गावरीच आणि अंबिकाची मिसळ फेव्हरेट.

बटाट्याचे पराठे

साहित्य : उकडलेले बटाटे, एक चमचाभर जीरं, लसूण- आलं मिरची, कोथिंबीर पेस्ट, अर्धा चमचा हळद, मीठ चवीप्रमाणे, तेल, कणिक, साजूक तूप.

कृती : उकडलेले बटाटे हातानं कुस्करून त्यात वाटण हळद, मीठ घालावं आणि अलगद एकजीव करावं. कणिक मळून तिचे मध्यम आकाराचे गोळे करावेत. बटाट्याचं सारण आत भरून ते लाटावं. तापलेल्या तव्यावर मंद आचेवर साजूक तूप लावून खरपूस भाजावं. गरमागरम पराठे ताज्या दुधाच्या सायीसोबत सर्व्ह कारावेत.

संकलन: निनाद पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>