सुवर्णा साळी
साहित्य - एक वाटी दलिया, अर्धी वाटी कोबी, एक-दोन हिरव्या मिरच्या, मूठभर कोथींबीर, अर्धी चमचा सोडा किंवा इनो, अर्धी वाटी तीळ.
कृती - हांडवा करण्यासाठी अर्धा तास दलिया भिजत घाला. भाज्या बारीक चिरून घ्या. कोथींबीर आणि मिरचीही बारीक चिरुन घ्यावी. हे सर्व साहित्य तसंच मीठ आणि इनो एकत्र करा. एका खोलगट पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून त्यात अर्धा चमचा तीळ घालावे. त्यावर ३ मोठे चमचे दालियाचे मिश्रण टाकावे. झाकण ठेवावे. परतून घ्यावे. गरमागरम हांडवा तयार. हा पदार्थ गरम किंवा गार दोन्ही पद्धतीने खाता येईल.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट