पुणे टाइम्स टीम
'ला मेरिडियन'च्या 'फिस्ट' या रेस्तराँचं नुकतंच रिलाँचिंग झालं असून, नव्या स्वरूपातलं हे रेस्तराँ खवय्यांच्या सेवेत रुजू आहे. रेस्तराँमध्ये उपलब्ध असलेल्या अनलिमिटेड बुफेमध्ये युरोपियन, आशियाई, अरेबिक आणि भारतीय खाद्यसंस्कृतीमधील विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
'लोकांचा आरोग्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्यानं इथले सर्व पदार्थ 'ऑलिव्ह ऑइल' आणि 'ट्रफल ऑइल'मध्ये तयार केले जातात. झैतुनी झिंगा, अंजीर और खोया के कोफ्ते, स्टीम्ड सीबास, मटण श्वार्मा आणि लेबनीज मेशवी ग्रिल हे आवर्जून टेस्ट करण्यासारखे पदार्थ आहेत, 'असं एक्झिक्युटिव्ह शेफ नादेर शेख यांनी सांगितलं.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट