साहित्य - दीड कप बासमती तांदूळ, सव्वा कप मसूर डाळ, चार लसूण पाकळ्या, पाच चमचे तूप, तीन चमचे तेल, तीन चमचे धणे पावडर, तीन चमचे जिरे, चार लवंगा, तीन वेलची, तमालपत्र, दालचिनी, पाच पाणी, दोन चमचे टोमॅटो रस, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि काळी मिरी.
कृती - गरम पाण्यात मसूर डाळ अर्धातास पाण्यात भिजत ठेवा. पाणी काढून दुसऱ्या ताज्या पाण्यात दहा मिनिटे शिजवून घ्या आणि काढलेले पाणी बाजूला ठेवा. पॅनमध्ये तूप टाकून कांदा आणि लसूण पाच मिनिटे परतून घ्या. आता यात बासमती तांदूळ आणि सर्व मसाले टाकून थोडा वेळ परतून घ्या. डाळ, टोमॅटो रस पाणी, मीठ व काळी मिरी पावडर टाकून शिजवून घ्या. उकळी आल्यानंतर झाकण ठेवून २५ मिनिटे मंद गॅसवर शिजवा. वरून कोथिंबीर घालून खिचडी खाण्यास द्यावी.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट