साहित्य :-एक वाटी चण्याची डाळ, गूळ/साखर, वेलची पूड, साधी पोळी
कृती :- एक वाटी चण्याच्या डाळीत अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घालून पुरण शिजवून घ्यावं. त्यात स्वादानुसार वेलची पूड घालावी. साध्या गव्हाच्या पोळीवर पुरण पसरवून त्याचा रोल करावा. हा रोल तीन ते चार मिनिटं वाफवून घ्यावा. नंतर त्याचे छोटे छोटे काप करावे. हे काप साजूक तूप घालून सर्व्ह करावे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट