होळीच्या दिवशी पुरणाची पोळी तर सगळ्यांकडेच असते. पण याच सणासाठी काही वेगळ्या पाककृती सांगितल्या आहेत, शेफ विष्णू मनोहर यांनी.
साहित्य :- फ्रेश पनीर २०० ग्रॅम, खवा १०० ग्रॅम, लवंग १ चमचा, वेलची १ चमचा, केशर पाव चमचा, सुका मेवा अर्धी वाटी, साखर १ वाटी, तूप अर्धी वाटी, दूध १ वाटी, तमालपत्र २-३
कृती :- सर्वप्रथम थोडा खवा घेऊन त्याचे छोटे गुलाबजाम तळून घ्या. नंतर साखरेचा पाक तयार करून पाक उकळत असताना त्यामध्ये सुका मेवा तसंच जाड किसलेले पनीर घाला. याबरोबरच तमालपत्र, वेलची, लवंगसुद्धा घाला. चिमूटभर घालून झाकून उकळत ठेवा. थोड्या वेळाचे लक्षात येईल की पनीरने बऱ्यापैकी साखर शोषून घेतली आहे त्यावेळी सर्व मिश्रण एका चाळणीमध्ये ठेवून गाळून घ्या. नंतर एका भांड्यात घालून त्यामध्ये दूध व खवा घालून एकत्र करा. मंद आचेवर थोडे शिजू द्या. सर्वात शेवटी तयार केलेले गुलाबजाम घालून सर्व्ह करा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट