आश्विन फडके, गंधाली देशपांडे
सध्या परीक्षांचा सीझन आहे. त्यामुळे रात्री मित्रमैत्रीणींच्या घरी अभ्यासाचे लेक्चर सुरू होतात. होस्टेलमध्ये अभ्यासाची जोरदार तयारी सुरू असते. अशात भूक लागणं नाकारता येत नाही. मात्र, रात्री घरच्यांपैकी कुणाला उठवून त्रास देण्यापेक्षा बाहेरच जाऊन काहीतरी खाऊयात असा विचार मनात येतो. तसंच, अभ्यासातून ब्रेक घेण्याच्या निमित्तानं बाइकला किक मारली जाते आणि रात्री खुल्या असणाऱ्या खाऊगल्लीची शोधमोहिम सुरू होते.
शहरात जशा काही खाऊगल्ल्या आहेत, तशाच रात्री सुरू असणाऱ्या खाऊगल्ल्या हडपसर, कात्रज, गाडीतळ, कॅम्प, खराडी बायपास इथंही आहेत. त्याचीच ही थोडक्यात यादी. रास्ता पेठेत राजेंद्र पावभाजी सेंटर आहे. डाळ घातलेली भाजी ही इथली खासियत. कॅम्पमधल्या गोकुळ पावभाजी अँड चायनीज सेंटरवर ए वन पदार्थ मिळतात. ५० ते १५० रुपयांत इथं सहज पोट भरतं. मंडईतल्या मार्केट उपहारगृहात १०० रुपयांत सुंदर जेवण मिळतं. शेव भाजी आणि अंडाभुर्जीवर तर आवर्जून ताव मारा.
हडपसर गाडीतळाजवळ एक गाडी लागते. त्यावरचा तवा पुलाव खायला बरीच गर्दी होते. ५०-८० रुपयांत इथं पोट भरतं. कात्रजच्या बसस्टॉपजवळ असणाऱ्या चायनीज गाडीवरही गर्दी पाहायला मिळेल. इथल्या पदार्थांचा सुवासच पहिल्यांदा भुरळ घालतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट