Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 1266

आलू पराठे द बेस्ट!

$
0
0

पौर्णिमा तळवलकर, अभिनेत्री

'अगं शिकून घे स्वयंपाक, उद्या सासरी गेलीस, की कसं बरं होईल तुझं? एकदम सगळं काम पडलं अंगावर तर?' हे आणि असे प्रश्न माझ्या आईनं मला कधी म्हणजे कधीच नाही विचारले, टि‌पीकल आई कॅटगिरीतली माझी आई नाही.

मला कंटाळा आणणारी एकमेव गोष्ट म्हणजे चहा बनवणं. एखाद्याला चुटकी सरशी वाटणारी ही गोष्ट मला विचारानंही दमवते. तेव्हा आई गमतीनं म्हणायची, की तुला चहाबाज सासर मिळायला हवं आणि तेही एकत्र कुटुंबातलं. सुदैवानं मला एकत्र कुटुंबातलं सासर मिळालं; पण सारे कॉफीचे भक्त. आजसुद्धा माहेरी गेले, की आईच्या हातचे पदार्थ आवर्जून खाते. तीही मोठ्या प्रेमानं मला खाऊ घालते. ताकातला पालक, कांदा-बटाट्याची परतलेली भाजी, रव्याचे लाडू, खमंग चिवडा असे एकाहून एक सरस पदार्थ. तोंडात ठेवता विरघळणारे दहिवडे केवळ माझीच आई बनवू शकते, असं मला वाटतं. आईनं शिकवलेला आलू पराठा मी तंतोतंत शिकलेय. माझा नवरा रोहित माझ्या हातच्या चिकनच्या नानाविध प्रकारांवर फिदा आहे. अळूचं फदफदसुद्धा परफेक्ट जमतं मला.

बोंबील ही तीन अक्षरं नुसती ऐकली, तरी डोळ्यांसमोर येतं ते पुण्याचं 'समुद्र'. जशी दारूबाजांना दारू चढते तसं इथं जेवण चढतं. मी अनुभव घेतलाय बरेचदा. 'तिरंगा'मधले तंगडी कबाब, प्रॉन्स फ्राय तर 'वरचा क्लास'. पुण्याला गेले आणि 'फिशकरी राइस'मध्ये भेट दिली नाही असं कधीच झालं नाही. सारे पदार्थ एकदम निगुतीने बनवलेलं असतात. चाइनीज खाण्याचा मूड झाला, की 'फाइव्ह स्पाइस'शिवाय दुसरा पर्याय नाही. तिथल्या नुडल्स आणि रेड थाई करी माझा क्रश आहेत.

आलू पराठे

साहित्य : सहा उकडलेले बटाटे, चमचाभर धणे जिरेपूड, चमचाभर आलं-मिरची पेस्ट, चमचाभर आमचूर पावडर, अर्धा चमचा हळद, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा पिठीसाखर, कणीक, साजूक तूप.

कृती : उकडलेले बटाटे हलक्या हातानं कुस्करावेत. त्यात कणीक आणि साजूक तूप वगळता बाकीचं सारं साहित्य घालावं. कणीक किंचितशी सैलसर भिजवून त्याचे गोळे करावेत. त्यात वरील सारण अलगद भरून पराठा लाटावा. नॉनस्टिक पॅनवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर खरपूस भाजावा. भाजताना बाजूनं साजूक तूप सोडावं. वाटीभर दाण्याच्या कुटामध्ये किंचित हिंग, मीठ, हळद तिखट, मीठ आणि चमचाभर गोड दही मिसळून त्यासोबत गरमागरम आलू पराठे सर्व्ह करावेत.

शब्दांकन : निनाद पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 1266

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>