साहित्य : सहा रायवळ आंबे, चार हापूस आंब्याचा रस, फणसाच्या गरे, दोन केळी, चार चमचे राईची पावडर, दोन चमचे लाल तिखट, एक वाटी नारळाचं दूध, चवीनुसार मीठ व साखर.
कृती - उकळत्या पाण्यात रायवळ आंबे टाकून वर झाकण देऊन गॅस बंद करावा. भांड्यात हापूस आंब्याचा रस घ्यावा, त्यात राई पावडर, लाल तिखट, मीठ, साखर घालून रस ढवळून, त्यात फणसाचे गरे छोटे तुकडे करून, केळ्याचे काप आणि नारळाचं दूध घालून रस सारखा करावा. रायवळ आंब्याची सालं काढून रसात घालून पुन्हा ढवळून घ्यावं आणि फ्रिजमध्ये गार करत ठेवावं. चपाती अथवा तांदळाच्या भाकरी बरोबर छान लागते.
कैरी आणि भोकरांचं लोणचं
साहित्य : आठ दहा भोकरं, तीन कैऱ्यांचा किस, एक वाटी लोणचं मसाला, चार चमचे राई, थोडा हिंग, राईचं तेल एक वाटी, मीठ, हळद, एक वाटी शेंगदाण्याचं तेल.
कृती - भोकरं स्वच्छ फडक्यांनी पुसून घ्यावी. एकाचे दोन तुकडे करून त्यातला चिक आणि बी काढून प्रत्यक्ष भोकराला हळद-मीठ, चीक जाईपर्यंत चोळावे. कैरीचा किस घट्ट पिळून घ्यावा, त्यात लोणच्याचा मसाला, मीठ, हळद, आणि शेंगदाण्याच्या तेलात, हिंग-राईची फोडणी गार करून ओतावी. हे मिश्रण एकजीव करून प्रत्येक भोकरांत भरावं. काचेच्या बरणीत भरून त्यावर राहिलेला किस टाकावा, त्यावर राईचं गरम करून गार झालेलं तेल टाकावं. झाकण लावून बरणी पाच-सहा दिवस उन्हात ठेवावी. लोणचं तयार.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट